अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एसबीआय ने 'मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस' आणून ग्राहकांच्या दारापर्यंत आणला आर्थिक समावेश

Posted On: 04 OCT 2023 9:51PM by PIB Mumbai

मुंबई, 4 ऑक्टोबर 2023

स्टेट बँक ऑफ इंडियाने, बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या आर्थिक समावेशी (FI) ग्राहकांसाठी 'मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस' सादर करण्याची घोषणा केली आहे. एसबीआय चे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेशन सशक्त करणे आणि आवश्यक बँकिंग सेवा जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.

हे हातात धरण्याजोगे आणि कोठेही नेता येण्याजोगे उपकरण थेट ग्राहकांच्या दारापर्यंत किओस्क बँकिंग आणून बँकिंग सुलभतेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. हे उपकरण ग्राहक सेवा बिंदू (CSP) वर काम करणाऱ्या एजंट्सना अधिक लवचिकता प्रदान करते ज्यामुळे ते ग्राहक जेथे आहेत तेथपर्यंत पोहोचू शकतात. या उपक्रमाचा विशेषत्वाने आरोग्य समस्या असणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजन यासारख्या ग्राहक सेवा बिंदू केंद्रात पोहचवण्यासाठी आव्हानांचा सामना करणाऱ्या ग्राहकांना फायदा होईल.

हे उपकरण त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात रोख पैसे काढणे, रोख ठेव, निधी हस्तांतरण, जमा रक्कम चौकशी आणि मिनी स्टेटमेंट या सारख्या पाच अति महत्त्वाच्या बँकिंग सेवा प्रदान करेल. या सेवा म्हणजे एसबीआयच्या ग्राहक सेवा बिंदू केंद्रातून केल्या जाणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी 75% पेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, बँक लवकरच या उपकरणाद्वारे सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे, पैसे पाठवणे आणि कार्ड-आधारित सेवा यासारख्या सेवांचा समावेश करून आपल्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

एसबीआय चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी या उपक्रमाबाबत आपला दृष्टीकोन व्यक्त केला,  "समाजातील सर्व घटकांसाठी, विशेषतः बँक खाते नसलेल्यांना, आर्थिक समावेशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या नव्या उपकरणामुळे, ग्राहकांना ते जिथे असतील तेथून व्‍यवहार करण्‍याचा विना खंड  अनुभव मिळेल. हा तंत्रज्ञान-आधारित उपक्रम आमच्या ग्राहकांना सोयीस्कर आणि घरातून बँकिंग सेवा प्रदान करून डिजिटायझेशनद्वारे आर्थिक समावेशन आणि सामाजिक कल्याण साधण्यासाठी एसबीआय ची वचनबद्धता अधोरेखित करतो."

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1964402) Visitor Counter : 130


Read this release in: English