निती आयोग
azadi ka amrit mahotsav

'महिला-प्रणित विकास सक्षम करणे- अंतिम टोकापर्यंत पोहचणे 'यावरील कार्यशाळेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पश्चिम भारतातील महिला उद्योजिकांबरोबर सहभाग

Posted On: 03 OCT 2023 9:00PM by PIB Mumbai

पणजी, 3 ऑक्टोबर 2023

नीती आयोग आणि राज्य सरकार द्वारा आयोजित  'महिला-प्रणित विकास सक्षम करणे' या विषयावरील कार्यशाळा आज पणजी मधील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था  येथे संपन्न झाली.यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते.

नीती आयोगाने  बळ  दिलेल्या या महिला उद्योजकता मंचाचे  आता सार्वजनिक-खाजगी भागीदारीत रूपांतर  झाले असून  महिला उद्योजकांशी संबंधित माहिती आणि सेवा इथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत , यात सरकारी योजना, इनक्यूबेटर, प्रवेगक आणि खाजगी क्षेत्रातील उपक्रमांसाठी स्मार्टमॅच , कम्युनिटी पेज आणि मार्गदर्शन मॉड्यूलचा समावेश आहे.

या कार्यशाळेला गोव्याचे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,नीती आयोग सदस्य डॉ. व्हीके सारस्वतनीती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी  बीव्हीआर सुब्रह्मण्यम, गोवा राज्य महिला बचत गट संस्थेच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यासारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, पिरामल फाऊंडेशन, आयसीएआय  (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया), सिडबी, ओला  फाउंडेशन  सारख्या प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.

उद्घाटन कार्यशाळेदरम्यान, स्टार्टअप 20 इंडियाचे अध्यक्ष आणि अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांनी जागतिक स्टार्टअप परिसंस्थेत विशेषत: वीस (G20) राष्ट्रांच्या गटात समावेशकता  आणि विविधतेच्या महत्त्वावर भर देणारे सादरीकरण (TED टॉक ) दिले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी उद्घाटनपर भाषणात  महिला-प्रणित विकासाद्वारे संतुलित वाढ साधणाऱ्या  केंद्र सरकारच्या उपक्रमांवर  भर दिला.

या सत्रादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा करण्यात आली, यामध्ये CAXpert यांचा उद्यम अपलिफ्ट, AIC-GIM-WEP यांचा सहयोग "We Nurture" आणि गोव्यातील उद्योजकांसाठी एटीआर  कार्यक्रम यांचा समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि नीती आयोग दरम्यान  भागीदारीची घोषणाही करण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे बीजभाषण झाले. प्रदेशात  महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाविषयी आपले विचार आणि दृष्टीकोन त्यांनी मांडला.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत , या कार्यक्रमाने महिला उद्योजकांसाठी  सहाय्यक वातावरण निर्मितीप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. भविष्यात भारताच्या आर्थिक परिदृश्याला आकार देण्यात महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या दिशेने ही कार्यशाळा  एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.  इथे सामायिक केलेली माहिती , नवीन भागीदारी  आणि नव्या उपक्रमांमुळे महिलांच्या नेतृत्वाखाली व्यवसाय भरभराटीस येतील असे वातावरण निर्माण होईल अशी अशा  आहे. महिला उद्योजकता मंच आणि गोवा राज्य महिला बचत गट संघटना यांच्यातील यशस्वी भागीदारीने कार्यक्रमाचा समारोप  झाला.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1963853) अभ्यागत कक्ष : 112
Read this releasein: English