पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ओएनजीसी  मुंबई द्वारे  एक तारीख एक तास एकत्रितपणे स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Posted On: 01 OCT 2023 4:26PM by PIB Mumbai

 

स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय आवाहनाला प्रतिसाद देत, ओएनजीसी  मुंबईने अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 10 ते 11 या वेळेत मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन गार्डन येथे भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

ही भव्य  स्वच्छता मोहीम स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा एक भाग होता. ओएनजीसीच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि इतर स्वयंसेवकांनीही या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला.

15 सप्टेंबर 2023 पासून आयोजित स्वच्छता ही सेवाचा एक भाग म्हणून, ओएनजीसीने देशातील विविध परिचालन क्षेत्रात अनेक अभिनव कार्यक्रम आयोजित केले.  ओएनजीसी मुंबईने स्वछता पंधरवड्यादरम्यान मुंबई आणि पनवेलमधील ओएनजीसीच्या निवासी वसाहतींमध्ये स्वच्छता मोहिमेसह अनेक कार्यक्रम आयोजित केले; पालघर जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषद शाळांमध्ये  स्वच्छता मोहीम आणि कचरा व्यवस्थापन सत्र आयोजित करण्यात आले होते तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाच गावांमध्ये स्वच्छता प्रतिज्ञा आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962979) Visitor Counter : 79


Read this release in: English