शिक्षण मंत्रालय
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी बी एस ई) च्या पुणे इथल्या प्रादेशिक कार्यालयाने राबवली 'एक तारीख एक तास एक साथ' ही स्वच्छता मोहीम
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2023 3:01PM by PIB Mumbai
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी बी एस ई) च्या पुणे इथल्या प्रादेशिक कार्यालयाने 'एक तारीख एक तास एक साथ' या उपक्रमाअंतर्गत आज स्वच्छता मोहीम राबवली. पुण्याच्या वडगाव शेरी इथल्या भिवाजी रावजी गलांडे उद्यानात हा उपक्रम पार पडला.

सी बी एस ई च्या विभागीय कार्यालयातील 50 अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या फेरीने या उपक्रमाची सुरुवात झाली. कार्यालय ते भिवाजी रावजी गलांडे अशी ही फेरी होती. या फेरीत त्यांनी फलक, बोधचिन्हे झळकवत आणि घोषणा देऊन लोकांमध्ये हा कार्यक्रम आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल जनजागृती केली.

स्वच्छता हीच सेवा या भावनेने प्रेरीत होऊन भिवाजी रावजी गलांडे उद्यानातील विविध परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने एकत्र आले. यातून खुल्या व्यायामशाळा, चालण्याच्या मार्गिका, खेळाचे मैदान आणि बागेतील इतर मोकळ्या जागेची संपूर्ण स्वच्छता झाली. त्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ आणि जास्तीत जास्त आकर्षित करून घेणारा परिसर मिळेल या हमीसह तशी वातावरण निर्मिती झाली. बागेतील चालण्याच्या मार्गिके वरील अगदी तणही परिश्रमपूर्वक काढण्यात आले.]

महत्त्वाचे म्हणजे, सी बी एस ई चे अधिकारी आणि कर्मचार्यांनी उद्यानात उपस्थित नागरिकांशी या निमित्ताने संवाद साधला. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सी बी एस ई चमूच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962934)
आगंतुक पटल : 112
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English