माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एक तारीख एक तास एक साथ : सीबीसी आणि पीआयबी गोवा, 1 गोवा बटालियन एनसीसी आणि सीसीपी ने पणजीत स्वच्छता मोहीम घेतली हाती
Posted On:
01 OCT 2023 3:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक तारीख एक तास एक साथ' या आवाहनाला प्रतिसाद म्हणून केंद्रीय संचार ब्युरो (CBC) आणि पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) गोवा क्षेत्रीय कार्यालयांनी 1 गोवा बटालियन राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि पणजी महापालिका (CCP) यांच्या संयुक्त विद्यमाने ला कॅम्पाला गार्डन, पणजी येथे स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा एक भाग म्हणून स्वच्छता मोहीम सुरू केली. या कार्यक्रमाला पणजी महापालिकेचे आयुक्त क्लेन मडेरा आणि 1 गोवा बटालियन राष्ट्रीय छात्र सेना पणजीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एमकेएस राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पणजीतील लोकप्रिय सार्वजनिक उद्यान ला कॅम्पाला गार्डन परिसरात नव्याने चैतन्य बहरले आहे. ला कॅम्पाला गार्डन येथील ॲम्फी थिएटरच्या आजूबाजूच्या परिसरात जंगली वनस्पतींची वाढ झाल्याने दाटी निर्माण झाली होती., "स्वच्छता मोहीम स्वच्छतेचा फक्त एक पैलू दर्शविते. जबाबदारी आणि शाश्वतता हे महत्त्वाचे धडे आहेत जे सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. कचऱ्याचे उत्पादन कमी करणाऱ्या जीवनशैलीचा अंगीकार तसेच पर्यावरणीय प्रदूषणाचे नियंत्रण अत्यावश्यक आहे." असा महत्त्वपूर्ण संदेश उद्घाटन समारंभात बोलताना कर्नल एमकेएस राठोड यांनी दिला.
क्लेन मडेरा यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या अतुलनीय उत्साहाचे कौतुक केले आणि स्वच्छता संदेश दूरवर पसरविण्याच्या महत्त्वावर जोर देऊन अशा कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक गौतम एस कुमार आणि केंद्रीय संचार ब्युरोचे प्रचार अधिकारी रियाझ बाबू उपस्थित होते. या उपक्रमात सुमारे 50 एनसीसी कॅडेट्स सक्रिय सहभागी झाले होते.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962818)
Visitor Counter : 75