नौवहन मंत्रालय

जागतिक सागरी दिन 2023 आणि ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS)-2023 या रोड शोमध्ये भारतीय सागरी उत्कृष्टतेचे प्रदर्शन 

Posted On: 30 SEP 2023 1:35PM by PIB Mumbai

 

जगभरातील सागरी उद्योगातील नेते, सरकारी अधिकारी, खलाशी आणि भागधारकांना एकत्र आणणारा एका भव्य उत्सव "जागतिक सागरी दिन 2023" आणि ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS)-2023" निमित्ताने आयोजित तिसरा रोड शो 29 सप्टेंबर 2023 रोजी संयुक्तपणे साजरा करण्यात आला. आधुनिक स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या हा कार्यक्रम भारताच्या सागरी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) 2023 या वर्षासाठी निवडलेल्या MARPOL at 50 – Our commitment goes on- 'मारपोल अॅट 50 - आमची वचनबद्धता कायम आहेया संकल्पनेनुसार आयोजित या कार्यक्रमाने, भारताच्या शाश्वत नौवहन पद्धतींबद्दलची वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.

भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि एनएमडीसीच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष कॅप्टन बी.के. त्यागी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले आणि या दिवसाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. यावेळी त्यागी यांनी ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS)-2023"च्या तयारीचीही तपशीलवार माहिती दिली, ज्यामध्ये जगभरातील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जहाजांचा सहभाग होता.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस श्री. किटॅक लिम यांच्या हृदयस्पर्शी व्हिडिओ संदेशाने, शाश्वत ग्रहासाठी तांत्रिक आणि हरित संक्रमणामध्ये मानवी घटकाला आघाडीवर ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी परिसंस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय सामर्थ्यावर आपला विश्वास व्यक्त केला. मुंबईत 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान नियोजित, जीएमआयएस-2023,परिषदेमध्ये भारताची प्रगती दाखवण्याच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी त्यांनी सर्व सागरी उद्योग भागधारकांना आवाहन केले.

शिपिंगचे उपमहासंचालक अश मोहम्मद यांनी जीएमआयएस-2023,परिषदेसाठी केलेल्या सूक्ष्म व्यवस्थेचे सादरीकरण केले.

या उत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय शिपिंग रजिस्टरचे व्यवस्थापकीय संचालक विजय अरोरा यांनी या वर्षीच्या संकल्पनेवर आधारित चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवले. डॉ. रजनीश कुमार, कॅप्टन तुषार प्रधान आणि  मुदित मेहरोत्रा ​​यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञ, यांनी यावेळी शाश्वत सागरी नौवहन पद्धतींवर चर्चा केली.

नेदरलँड्सच्या राज्याचे महावाणिज्य दूत, बार्ट डी जोंग, यांनी डीकार्बोनायझेशनवर लक्ष केंद्रित करून मारपोल MARPOL परिषदेचे महत्त्व आणि त्याच्या विकसित होत असलेल्या नियामक आराखड्यावर भर दिला. प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भागीदारी आणि सहकार्याच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.

आर. लक्ष्मणन, आयएएस, सहसचिव (अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक, प्रशासन आणि समन्वय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, नवी दिल्ली), यांनी जागतिक स्तरावर सागरी क्षेत्रात भारताची उत्कृष्टता दाखवून, जीएमआयएस परिषदेसाठी भारताची उपलब्धी आणि तयारी विषयी माहिती दिली.

श्याम जगन्नाथन, आयएएस, शिपिंग महासंचालक आणि एनएमडीसीच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष, यांनी भारताच्या सागरी प्रगतीबद्दल अंतर्दृष्टी सामायिक केली, ज्यात मेरीटाइम इंडिया व्हिजन-2030 समाविष्ट आहे. त्यांनी भारतातील मारपोल(MARPOL) परिषदेच्या  यशस्वी अंमलबजावणीसाठी एक रोडमॅप तयार केला आणि जीएमआयएस परिषदेमध्ये भारताच्या सागरी विकासाचे साक्षीदार होण्यासाठी भागधारकांना आमंत्रित केले.

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1962390) Visitor Counter : 99


Read this release in: English