भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर-एनआयओतर्फे 'समुद्र मंथन' 23, भारतातील प्रमुख समुद्रशास्त्र अभ्यासक मेळाव्याचे आयोजन

Posted On: 29 SEP 2023 4:51PM by PIB Mumbai

गोवा, 29 सप्टेंबर 2023

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था  (सीएसआयआर-एनआयओ) ने पहिल्या 'समुद्र मंथन' 23 - पहिल्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र अभ्यासक मेळाव्याचे आयोजन केले होते, ज्यात समुद्रशास्त्राच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी 200 पेक्षा अधिक विद्वान,पोस्ट डॉक्टरल फेलो आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सीएसआयआर एनआयओ, गोवा येथील एस.झेड कासिम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाने समुद्रशास्त्राच्या जगात अतिशय महत्त्वपूर्ण असा मैलाचा टप्पा गाठला आणि आपल्या विशाल आणि गुंतागुंतीच्या समुद्राचे गूढ शोधण्यासाठी मान्यवरांना एकत्र आणले.

28 सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे संचालक डॉ. थम्बन मेलोथ उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारताच्या कानाकोपऱ्यातील अभ्यासक, नामवंत शास्त्रज्ञ आणि समुद्रशास्त्राच्या क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक उपस्थित होते.

एनआयओचे संचालक प्रा.सुनीलकुमार सिंह यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सरकारचे खोल महासागर मोहिमेचे लक्ष लक्षात घेता या मेळाव्याची कालबद्धता अधोरेखित केली. तरुण समुद्रशास्त्रज्ञांना या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या व्यासपीठाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला, ज्यामुळे त्यांचे संशोधन नव्या उंचीवर पोहोचेल. सिंग यांनी देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांचे कौतुक केले आणि फलदायी आणि संस्मरणीय कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

एनआयओच्या विद्यार्थी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समुद्र मंथन'23 मासिकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉ.थम्बन मेलोथ यांच्या हस्ते करण्यात आले.

आयोजन समितीचे संयोजक श्री. थावपांडियन पी. यांनी यशस्वी कार्यक्रमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले.

PIB Panaji | S.Thakur/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 


(Release ID: 1962065) Visitor Counter : 82


Read this release in: English