आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सेवा पंधरवड्याअंतर्गत सीजीएचएस मुंबईच्या वतीने रक्तदान शिबिर आणि अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 28 SEP 2023 7:17PM by PIB Mumbai

मुंबई, 28 सप्‍टेंबर 2023

 

सामुदायिक एकजुटीचे उल्लेखनीय प्रदर्शन घडवत, केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (सीजीएचएस) मुंबई कार्यालयाने 27 सप्टेंबर 2023 (बुधवार) रोजी सेवा पंधरवडा  2023 चा एक भाग म्हणून, रक्तदान शिबिर आणि अवयवदानावर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. सीजीएचएस वेलनेस सेंटर क्रमांक 1, एजी सभागृह, प्रतिष्ठा भवन आणि शमिना सभागृह, प्राप्तिकर भवन, मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमांना प्रचंड सहभाग आणि लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबिराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हे शिबीर टाटा स्मृती रुग्णालय आणि सीजीएचएस पंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 'अवयवदानाचे महत्त्व' या विषयावर कार्यक्रम झाला. उत्साही सहभागींमध्ये सीजीएचएस मधील समर्पित व्यक्ती तसेच केंद्र सरकारची विविध कार्यालये आणि लोकांमधील सदस्यांचा समावेश होता. एका समान कारणासाठी हे सगळे एकत्र आले होते.

सध्या सुरु असलेल्या सेवा पंधरवडा  2023 चा भाग म्हणून 27 सप्टेंबर 2023 रोजी सीजीएचएस वेलनेस सेंटर क्रमांक 1, एजी सभागृह, प्रतिष्ठा भवन, मुंबई येथे आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबीर सुरू झाल्याच्या पहिल्या एका तासातच, 25 व्यक्तींनी स्वेच्छेने रक्तदान केले. एकूण 163 स्वयंसेवक रक्तदान शिबिरात सहभागी झाले. काटेकोर आरोग्य मूल्यमापनानंतर 114 स्वयंसेवक रक्तदानासाठी पात्र आढळले आणि त्यांनी रक्तदान केले. त्यांचे हे निस्वार्थी योगदान जीव वाचवण्याच्या कामी निश्चितच उपयुक्त ठरेल. या जीवरक्षक उपक्रमात देलेल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आले.

अवयवदानाबद्दलच्या जनजागृती कार्यक्रमादरम्यान अवयव आणि शरीरदान महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी केलेल्या प्रेरक भाषणाने उपस्थितांना प्रेरणा दिली. यानंतर अवयवदानाच्या संकल्पनेवर आधारित एक माहितीपार मनोरंजन कार्यक्रम झाला. यामध्ये सीजीएचएस  मुंबईचे कर्मचारी सहभागी झाले होते.

विविध वरिष्ठ डॉक्टर आणि अधिकारी यांच्यासह उपस्थित असलेले सीजीएचएस मुंबईचे अतिरिक्त संचालक डॉ निर्मल मंडल यांनी, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि पाठिंबा देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ही व्यापक कार्य सामुदायिक निरामयता आणि आरोग्याला चालना देण्यासाठी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करते, असे ते म्हणाले.

पत्र सूचना कार्यालयाने रक्तदानाचे महत्त्व आणि अवयवदान जागरूकता अधोरेखित करण्याबरोबरच या कार्यक्रमाला प्रसारमाध्यमातून व्यापक प्रसिद्धी दिली.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961813) Visitor Counter : 74


Read this release in: English