ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय- 2 ने आयएस18283:2023 साठीच्या पोर्टेबल क्षेत्र तपासणी किट्ससाठी मानक मंथन कार्यक्रमाचे आयोजन केले; मापदंडांच्या सुधारणेसाठी भागधारकांकडून मागवला मौल्यवान अभिप्राय

Posted On: 26 SEP 2023 4:37PM by PIB Mumbai

मुंबई, 26 सप्टेंबर 2023

भारतीय मानक ब्युरोच्या (भारतीय राष्ट्रीय मानक संस्था)मुंबई शाखा कार्यालय क्र. 2 ने आज मुंबईत पवई येथील हिरानंदानी गार्डन्समधील एमटीएनएल सीईटीटीएल सीईटीटीएम इमारतीमध्ये मिश्र पद्धतीने मानक मंथन या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात आयएस 18283:2023 या पिण्याच्या पाण्याची प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्यासाठीच्या क्षेत्र चाचणी किट्स संबंधी चर्चा करण्यात आली. बीआयएसने सर्व संबंधित भागधारकांना सहभागी होऊन वरील भारतीय मापदंडाविषयी त्यांचे मौल्यवान अभिप्राय नोंदवण्यासाठी आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला पीडब्ल्यूडी उत्पादक, तपासणी प्रयोगशाळा आणि वापरकर्ते यांच्यासह भागधारकांच्या विभागातील 23 सहभागी उपस्थित होते.

बीआयएसच्या मुंबई शाखा कार्यालय क्र.2 चे वरिष्ठ संचालक संजय वीज यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आपल्या  भाषणात त्यांनी मानक मंथन सारख्या कार्यक्रमांच्या गरजेवर अधिक भर दिला आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना भारतीय मानकांच्या अधिक सुधारणेसाठी त्यांच्या सूचना मांडण्याची विनंती केली. बीआयएसच्या मुंबई शाखा कार्यालय क्र.2 मधील पदवीधर अभियंता रक्षिता फाटक आणि कार्यालयाचे उपसंचालक टी.अर्जुन यांनी उपस्थितांना बीआयएसच्या विविध उपक्रमांची तसेच नव्याने प्रकाशित झालेल्या प्रमाणक आयएस 18283:2023 विषयी माहिती दिली.

बीआयएसचे मुंबई कार्यालय उपसंचालक टी.अर्जुन यांनी प्रमाणकांचे तपशील सादर केले तसेच सहभागींनी कलम-निहाय विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी सहभागींना 18283:2023चे तांत्रिक तपशील समजावून दिले. सर्व सहभागींनी मानक मंथन कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेतला. या कार्यक्रमातील सहभागींनी मांडलेल्या सूचना तांत्रिक विभागाशी सामायिक केल्या जातील, जेणेकरून त्यांचा योग्य पद्धतीने भारतीय मानकांमध्ये समावेश करता येईल.

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1960907) Visitor Counter : 102


Read this release in: English