ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाच्या मुक्त बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री
Posted On:
22 SEP 2023 5:02PM by PIB Mumbai
मुंबई, 22 सप्टेंबर 2023
ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिनांक 13.06.2023 च्या पत्राद्वारे मुक्त बाजार विक्री योजनेद्वारे (स्थानिक) ओएमएसएस (जी) गहू आणि तांदूळ यांची विक्री करण्यास मान्यता दिली केली होती. केन्द्र सरकारच्या साठ्यातून 50 लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रीया उद्योग/गहू उत्पादनांच्या उत्पादकांना ओएमएसएस (जी) अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅनकार्ड 100 (मेट्रिक टन) गहू मर्यादेसह देण्यास मान्यता देण्यात आली आहे. जेणेकरुन, गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, किंमत स्थिरतेचा लाभ वास्तविक ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल.
त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ओएमएसएस (जी) द्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीला मान्यता दिली आहे. उत्पादक आणि प्रक्रियादारांव्यतिरिक्त, तांदळाचे व्यापारी देखील तांदळाच्या विक्री लिलावात भाग घेऊ शकतात. बोली लावणारा जास्तीत जास्त 1000 मेट्रिक टनासाठी बोली लावू शकतो. त्यानुसार एफसीआयच्या गहू आणि तांदूळ विक्रीसाठी 28.06.2023 आणि नंतर दर बुधवारी लिलाव सुरू झाला. आत्तापर्यंत गव्हाचे 12 तर तांदळाचे 11 लिलाव झाले आहेत.
या लिलावामध्ये 5,45,260 मेट्रिक टन गहू आणि 7,15,688 मेट्रिक टन तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. त्यात रास्त सरासरी गुणवत्तेच्या गव्हासाठी 2150 रुपये/क्विंटल राखीव किमतीत आणि कमी वैशिष्ट्य असलेल्या गव्हासाठी 2125 रुपये/क्विंटल तर पोषणयुक्त तांदळासाठी 2973 रुपये प्रति क्विंटल आणि एफएक्यू तांदळासाठी रु 2900/क्विंटल दराचा समावेश आहे.
त्यापैकी 2,66,680 मेट्रिक टन गहू आणि 1210 मेट्रिक टन तांदूळ स्वीकारलेले प्रमाण आहे. 20.09.2023 पर्यंत, 2,13,420 मेट्रिक टन गहू आणि 990 मेट्रिक टन तांदूळ ओएमएसएस (जी) द्वारे उचलण्यात आला आहे. एफसीआयचा गहू आणि तांदूळ बाजारात आणल्याने गहू आणि तांदूळाच्या किंमतीवरील चलनवाढीवर प्रतिबंधात्मक प्रभाव पडतो.
S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1959699)
Visitor Counter : 85