युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पुणे येथे 22 सप्टेंबरपासून दुसरी खेलो इंडिया महिला लीग शहर/ विभागस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धा-2023 चे आयोजन

Posted On: 20 SEP 2023 8:35PM by PIB Mumbai

मुंबई, 20 सप्‍टेंबर 2023

 

भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र मुंबई यांनी महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स लीग (शहर/विभाग स्तर) ही बहुप्रतिक्षित स्पर्धा, पुणे येथे  होणार असल्याची घोषणा केली.

ही  स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 रोजी बाबुराव सणस मैदान, सारसबाग, पुणे, महाराष्ट्र 411030 येथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी होतील. एक खेळाडू जास्तीत जास्त 2 प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.

यावेळी होणा-या  विविध क्रीडाप्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

ट्रॅक आणि फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मी;  लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक.

खेळाडूंना आपली नावे खालील लिंकवर नोंदणी करता येईल:

http://www.smrsports.in/athletic/registration/1694443132R1Fg1s5hIkqOzcm9fJYxbNhfgyKhtenM

खेलो इंडिया महिला ऍथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा धावणे, उडी, थ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडाप्रकारात खेळाडूंना चमकण्याची एक विलक्षण संधी मिळणार आहे.

या खेलो इंडिया महिला लीगचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत स्पर्धा संरचना आणि महिला खेळाडूंची प्रतिभा ओळख मजबूत करणे नाही तर महिला खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

क्रीडा विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, खेलो इंडिया योजनेच्या महिला खेळाडूंच्या योजनेअंतर्गत, यापूर्वी 2021-22 आणि 2022-23 मध्ये स्पर्धेच्या दोन आवृत्त्या आयोजित केल्या होत्या. स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, महिला लीगमध्ये विविध वयोगटातील 23,000 पेक्षा जास्त महिला खेळाडूंसह 240 हून अधिक सामन्यात सहभागी झाल्या होत्या.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959210) Visitor Counter : 114


Read this release in: English