संरक्षण मंत्रालय

पुणे येथील ‘सदर्न कमांड’ मुख्यालयामध्‍ये आर्थिक नियोजन परिषद

Posted On: 20 SEP 2023 8:26PM by PIB Mumbai

पुणे, 20 सप्‍टेंबर 2023

 

पुणे येथील  ‘सदर्न कमांड’ च्या मुख्यालयाने 20 सप्टेंबर 2023 रोजी आर्थिक नियोजनावर एका समन्वय  परिषदेचे  आयोजन केले होते. अशा प्रकारच्या पहिल्याच परिषदेने सैन्य आणि संरक्षण लेखा विभाग पीसीएसडीए, सीएसडीए आणि कमांडच्या आयएफए च्या अधिकार्‍यांना समान संघटनात्मक हितसंबंधांच्या दिशेने एकत्रितपणे वाटचाल करण्यासाठी एक समान व्यासपीठ प्रदान केले. 

यावेळी बोलताना सदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल ए के सिंग, यांनी डॉ. आर.एस. चव्हाण (पीसीडीए) यांच्या नेतृत्वाखालील डीएडी चमूच्या कोणत्याही  स्वार्थाशिवाय समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल प्रशंसा केली. राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने संरक्षण दलांकडे आहेत याची त्यांनी ग्वाही दिली.

तंत्रज्ञान आत्मसात केल्याने सर्व प्रक्रिया सुव्यवस्थित होऊ शकतात, त्रुटी कमी होऊ शकतात आणि आर्थिक क्रियान्वयनात ‘रीअल-टाइम’  अंतर्दृष्टी प्रदान केली जाऊ शकते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी सदर्न कमांडने लष्कराच्या  आपल्‍या कक्षेमध्‍ये  प्रगतीसाठी हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांच्या अनेक उपक्रमांची यादी केली,  ज्यामध्ये संस्थे अंतर्गत विकसित खरेदीसाठी सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर,’ PrAS’  यांचा समावेश होता. 

उच्च नैतिक मानकांचे पालन करण्यात कोणत्याही प्रकारची तडजोड अशक्य असून आपण सदैव राष्ट्राचे हित सर्वांसमोर ठेवून कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सर्व संबंधित मंडळी यापुढेही सन्मानाने आणि कोणत्याही भेदभावाशिवाय संस्थेची सेवा करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

* * *

PIB Pune | S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959209) Visitor Counter : 108


Read this release in: English