वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चौदाव्या जागतिक मसाले  कॉंग्रेसचा नवी मुंबईत प्रारंभ


15 ते 17 सप्टेंबर दरम्यान आयोजित मसाला कॉंग्रेसमध्ये जगभरातील प्रमुख मसाला उद्योजक सहभागी होणार 

Posted On: 15 SEP 2023 7:28PM by PIB Mumbai


 

नवी मुंबई येथे आज चौदावी जागतिक स्पाईस काँग्रेस, म्हणजेच मसाल्यांची भव्य जागतिक परिषद सुरु झाली. चौदाव्या वर्ल्ड स्पाईस काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अमरदीप सिंग भाटिया म्हणाले की, भारताची मसाला निर्यात सध्या 4 अब्ज डॉलर्स इतकी असून, ती 2030 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.  

भारत जागतिक मसाला उद्योगामध्ये आघाडीची भूमिका बजावत असून, परंपरेने भारत हे जगाचे मसाल्यांचे केद्र राहिले आहे. या क्षेत्रात भारताचे पारंपारिक सामर्थ्य अबाधित राहावेम्हणून उत्पादकांपासून विक्रेत्यांपर्यंतच्या संपूर्ण उत्पादन साखळीमध्ये अनेक पैलूंवर काम करणे आवश्यक आहे, ते पुढे म्हणाले. चाचणी प्रयोगशाळा, मूल्यांकन गुणवत्ता मानके यासारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी योजना आणि कार्यक्रम आखणे, ही सरकार आणि मसाला मंडळाची सामायिक जबाबदारी आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमामुळे सर्व भागधारक, प्रतिनिधी, प्रदर्शक आणि उत्पादकांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतील, ते म्हणाले.

भारतीय मसाले उद्योगाच्या क्षमतांवर प्रकाश टाकताना, मसाले मंडळाचे सचिव डी. साथियान म्हणाले, मसाल्यांचा वारसा हा मानवी संस्कृतीचा भाग आहे. भारत हा जगाचा मसाल्यांचे पात्र आहे. भारतामध्ये उत्पादन विकास, जैव-तंत्रज्ञान इत्यादींबाबत  प्रचंड क्षमता आहे. भारतात 75 पेक्षा जास्त मसाल्याचे उत्पादन घेतले जाते प्रत्येक राज्यामध्ये मसाल्यांचे उत्पादन आहे. या तीन दिवसीय जागतिक मसाला काँग्रेसमध्ये जागतिक मसाला उद्योगाच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा केली जाईल.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मसाल्यांचे विविध प्रकार आणि मूल्यवर्धित मसाला उत्पादने, मसाला उद्योगातील नवोन्मेशी तंत्रज्ञान आणि उपाय यांची माहिती देणाऱ्या  प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. मसाले मंडळाचे सचिव डी. साथियान यांनी यावेळी भारतीय मसाला क्षेत्रावरील सादरीकरण केले.

या कार्यक्रमानंतर देशाच्या   दृष्टीकोनातून मसाला उद्योग आणि वैश्विक  संधी या संदर्भात    या विषयावर तांत्रिक सत्र झाले. मसाल्यांच्या व्यापारासाठी उदयोन्मुख  देशांच्या बाजारपेठेच्या गरजाया विषयावरील दुसरे सत्र झाले. यामध्ये जागतिक पुरवठा साखळीतील लवचिकता, बाजार संशोधन आणि ग्राहकांच्या दृष्‍टीने  महत्त्वआणि  मसाल्यांच्या विकसित बाजारपेठेतील यशासाठी तत्पर प्रतिसाद यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

जागतिक मसाला परिषद 2023 ची संकल्पना  "दृष्टीकोन  2030: शाश्‍वतता, उत्पादकता, नावीन्य, सहयोग, उत्कृष्‍टता, आणि  सुरक्षितता" (S.P.I.C.E.S) आहे. या परिषदेमध्‍ये  पिके आणि बाजार अंदाज आणि कल यांच्याविषयी विविध सत्रांध्‍ये मार्गदर्शन करण्‍यात येईल.  अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके आणि प्रमाणपत्रे; मसाल्यांचा औषधांसाठी वापर ,पोषणमूल्य वाढविण्‍यासाठी वापर , नावीन्यपूर्ण प‍द्धतीने वापर आणि प्रतिबंधात्मक  आरोग्य उत्पादनासाठी वापरमसाल्यांच्या व्यापारातील कल  आणि संधी; मसाले-आधारित उद्योग  आणि कार्यात्मक अन्न उत्पादने; वापरण्यासाठी  तयार/स्वयंपाकासाठी / पेय उत्पादने; मसाले उत्पादनाची विविध प्रकारचे  तेल काढणे  आणि इतर  कल आणि संधी, ग्राहकांकडून दिले जाणारे  प्राधान्य आणि उदयोन्मुख प्रवाह , पुरवठा साखळी व्यवस्थापनातील विश्वासार्हता आणि अखंडता, पॅकेजिंगविषयी  आंतरराष्ट्रीय आवश्यकता, जागतिक मसाला बाजारातील प्रवाह  आणि संधी इत्यादींवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

वर्ल्ड स्पाइस काँग्रेसविषयी:

डब्ल्यूएससी’ – वर्ल्ड स्पाइस काँग्रेस हाजागतिक मसाला उद्योगामध्‍ये  कार्यरत असणारा मंच आहे. गेल्या तीन दशकांपासून  मसाले या क्षेत्रातील आव्हाने  आणि संबंधित गोष्‍टींवर  विचार विनिमय  करण्यासाठी डब्ल्यूएससी’  हे सर्वात योग्य व्यासपीठ बनले आहे. भारत सरकार, मसाले मंडळ, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालययांच्या  नेतृत्वाखाली विविध व्यापार आणि निर्यात मंचांच्या पाठिंब्याने वर्ल्ड स्पाइस काँग्रेसचे आयोजन करण्‍यात आले आहे.  या क्षेत्राला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. व्यापार, शाश्वतता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा उपक्रम, या क्षेत्रातील ताज्या  घडामोडी, आव्हाने  आणि भविष्यातील शक्यता यावर उद्योगातील प्रमुख,उत्पादक, व्यापारी, प्रक्रिया करणारे उद्योजक, निर्यातदार आणि जगभरातील नियामकांद्वारे या परिषदेत तपशीलवार चर्चा केली जाते.

भारतीय मसाला मंडळाविषयी

भारतीय मसाल्यांचा जागतिक स्तरावर विकास आणि प्रोत्साहन यासाठी मसाले मंडळ  (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्र सरकार ) ही संस्था कार्यरत आहे.

***

N.Chitale/R.Agashe/S.Bedekar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1957889) Visitor Counter : 117


Read this release in: English