माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित ‘वार्तालाप’ कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकशाहीमधली माध्यमांची महत्वाची भूमिका केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
12 SEP 2023 7:20PM by PIB Mumbai
गोवा, 12 सप्टेंबर 2023
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथील पत्रसूचना कार्यालयातर्फे गोव्यात फोंडा येथे आयोजित ‘वार्तालाप’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित केले. या वार्तालाप कार्यक्रमात पत्रकार, माहिती आणि प्रसिद्धी संचालनालयाचे विविध अधिकारी तसेच पार्वतीबाई चौघुले महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना, कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमांना “चौथा स्तंभ” म्हणून असलेले महत्त्व तसेच पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या सुनिश्चितीमध्ये माध्यमांची असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. माध्यमांच्या बहु आयामी भूमिकेची देखील त्यांनी प्रशंसा केली.

ते म्हणाले की माध्यमे केवळ माहिती पुरवत आणि शिक्षित करत नाहीत तर ती दक्ष जागल्याचे काम करून सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार देखील ठरवतात. पारदर्शक तसेच विश्वासार्ह प्रशासनाची जोपासना करण्यासाठी, विशेषतः भारतासारख्या लोकशाही देशात अशा प्रशासनाचे संवर्धन करण्यासाठी मुक्त आणि जबाबदार माध्यमांच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेवर त्यांनी अधिक भर दिला.

माध्यमांचा प्रशासनावर पडणारा खोलवर प्रभाव, विशेषतः अत्यंत सोप्या रीतीने माहिती उपलब्ध आहे अशा सध्याच्या काळात, हा प्रभाव किती असतो यावर केंद्रीय मंत्र्यांनी प्रकाश टाकला. प्रशासनाचे कार्य सुधारण्याच्या बाबतीत माध्यमांकडे आजच्याइतकी महत्त्वाची जबाबदारी कधीच नव्हती यावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी भर दिला.

अन्तृझ पत्रकार संघाच्या सक्रीय पाठींब्याने आयोजित करण्यात आलेल्या या ‘वार्तालाप’ कार्यक्रमातील विविध सत्रांमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली:
- दिव्यांग व्यक्तींवर आधारित गाथांचे वार्तांकन: गोवा राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठीच्या आयोगाचे सचिव ताहा हाझिक यांनी यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भातील वार्तांकन करताना अधिक संवेदनशीलता बाळगण्याच्या मुद्द्यावर भर दिला. अशा व्यक्तींसाठी समावेशकतेमध्ये वाढ करण्यात माध्यमे तसेच समाज यांच्याकडे असलेल्या भूमिकेवर त्यांनी अधिक भर दिला.
- वन्यजीव विषयक वार्तांकन: भारतीय वन्य सेवेतील अधिकारी आणि दक्षिण गोव्याचे उप वन संरक्षक प्रेमकुमार यांनी वन्यजीवविषयक समस्यांवर वार्तांकन करताना समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा बातम्या देताना, विशेषतः वन्यजीवांच्या संदर्भातील गुन्ह्यांचे वार्तांकन करताना अचून तसेच विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे महत्त्व देखील त्यांनी समजावून सांगितले.
- गोव्यातील स्टार्टअप परिसंस्था: गोवा स्टार्ट अप आणि माहिती तंत्रज्ञान प्रोत्साहन कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत डी.एस. यांनी गोवा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी सुरु केलेल्या स्टार्ट अप योजनांबाबत त्यांचे विचार मांडले. गोवा राज्यातील सुमारे 1040 स्टार्ट अप उद्योगांनी डीपीआयआयटीमध्ये नोंदणी केली आहे याचा देखील त्यांनी ठळक उल्लेख केला. या सत्रात गोव्यातील उद्योजक आणि राज्य तसेच केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या विविध मदतविषयक प्रणालींचे लाभार्थी डॉ.रोशन नाईक यांचे देखील भाषण झाले.
- घेण्याचा सल्ला त्यांनी उदयोन्मुख पत्रकारांना दिला.समाज माध्यमांच्या या युगातील संपादकीय लेखन: प्रुडंट या वृत्तवाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य यांनी समाज माध्यमांच्या युगातील चुकीच्या बातम्यांच्या प्रसारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत चर्चा केली. तसेच माहिती देण्यापूर्वी त्यातील तथ्ये तपासून

या ‘वार्तालाप’ कार्यक्रमात गोवा येथील केंद्रीय संचार ब्युरोतर्फे केंद्र सरकारची सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची 9 वर्षे या विषयावर प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षांच्या काळात राबवलेल्या विविध योजना, प्रकल्प आणि त्यांच्या यशोगाथा यावर या प्रदर्शनात अधिक भर देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनीच या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1956720)
आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English