माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएफडीसी द्वारे दिग्दर्शक जॉन अब्राहम यांच्या सन्मानार्थ एनएफएआय द्वारे पुनर्संचयित अम्मा अरियन चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन

Posted On: 06 SEP 2023 4:35PM by PIB Mumbai

पुणे, 6 सप्‍टेंबर 2023

 

NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (NFAI), प्रसिद्ध दिग्दर्शक जॉन अब्राहम यांच्या सन्मानार्थ त्यांनी दिग्दर्शित केलेला अम्मा अरियन (मल्याळम, 1986) या चित्रपटाचा विशेष खेळ (स्क्रीनिंग) आयोजित केला आहे. ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटच्या "टॉप 10 इंडियन फिल्म्स" च्या यादीत स्थान मिळवणारा हा एकमेव दक्षिण भारतीय चित्रपट होता. NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (NFDC-NFAI) ने या चित्रपटाचे डिजिटायझेशन आणि पुनर्संचयन केले आहे.

दिग्दर्शक जॉन अब्राहम यांनी मल्याळम आणि तमिळ भाषेत मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती केली असून, ते पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे विद्यार्थी होते. या संस्थेमधून पदवी घेताना त्यांनी पटकथा लेखन आणि चित्रपट दिग्दर्शनामधील सुवर्ण पदक मिळवले होते. त्यांच्या ‘अम्मा अरियन’ या चित्रपटासह एफटीआयआय मध्ये शिकत असताना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कोयना नगर (1967), प्रिया (1967), आणि Hides and Strings (1969) हे तीन लघुपट देखील यावेळी दाखवले केले जातील. मल्याळी भाषेतील हे चित्रपट इंग्रजी उप-लिपिसह (सबटायटल्स) प्रदर्शित केले जाणार असून, यासाठी प्रवेश विनामुल्य आहे.

 

‘अम्मा अरियन’ हा लघुपट, एका तरुणाने त्याच्या आईला लिहिलेल्या मार्मिक पत्रांमधून मांडलेली जीवन, निराशा आणि जगण्याबाबतची त्याची निरीक्षणे आपल्यासमोर उलगडतो. 'कोयना नगर' हा लघुपट, 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना येथे झालेल्या भूकंपाच्या घटनेवर आधारित आहे. ‘हायड्स अँड स्ट्रिंग्स’ हा लघुपट पुण्यामधील वाद्य निर्मात्यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘प्रिया’ हा लघुपट प्रिया नावाच्या एका तरुणीच्या जीवनातील काही दिवसांचा प्रवास घडवतो.

एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी-एनएफएआय) ने हाय डेफिनिशनमध्ये पुनर्संचयित केलेला अम्मा अरियन हा चित्रपट, आणि 35 मिमी प्रिंटवरील लघुपट, एनएफडीसी-एनएफएआय, लॉ कॉलेज रोड, पुणे इथल्या मुख्य चित्रपट गृहात शनिवार, 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून प्रदर्शित केले जातील. पुणेकर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955136) Visitor Counter : 108


Read this release in: English