अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रिझर्व बँकेने मुंबईत आयोजित केली आर्थिक साक्षरतेवरील चौथी क्षेत्रीय पातळीवरची अखिल भारतीय प्रश्नमंजूषा स्पर्धा

Posted On: 01 SEP 2023 7:45PM by PIB Mumbai

 

मुंबई, 1 सप्टेंबर 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आयबीआय) मुंबईत 30 ऑगस्ट 2023 रोजी आर्थिक साक्षरतेवरील चौथी क्षेत्रीय पातळी वरची अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, गोवा ही राज्ये आणि दादरा नगर हवेली (डीएनएच) आणि दमण आणि दीव (डीडी) या केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य पातळी वरील स्पर्धेचे विजेते यात सहभागी झाले होते. या राज्यांमधील सुमारे 9,000 शाळांचे सुमारे 18,000 विद्यार्थी आपल्या राज्यातील प्रभागजिल्हा आणि राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते.

विभाग पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेले सहा संघ पुढील प्रमाणे: (i) जिल्हा परिषद प्रशाला खोकरमोहा, महाराष्ट्र, (ii) सरकारी माध्यमिक विद्यालय, मिर्झापूर iii) सरकारी उच्च माध्यमिक शाळा टोकरखडा मराठी माध्यम, केंद्रशासित प्रदेश डीएनएच आणि डीडी (iv) सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळा शिक्षा नगर, मध्य प्रदेश (v) हुतात्मा बाळ गोपाळ देसाई मेमोरियल सरकारी हायस्कूल, गोवा आणि (vi) केंद्रीय विद्यालय, बैकुंठपूर, छत्तीसगड.

शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय शिक्षा नगर, मध्य प्रदेशचे अभिषेक पाठक आणि मोहित राठौर हे विभागीय फेरीचे विजेते ठरले, आणि ते आरबीआय द्वारे यापुढे आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत सहभागी होतील. विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना आरबीआयच्या मुख्‍य महाप्रबंधक  सोनाली सेनगुप्ता आणि इतर मान्यवरांनी सन्मानित केले.

आर्थिक समावेशकता वाढवणे, हे देशाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. आर्थिक साक्षरता ग्राहकांना माहितीपूर्ण निवड करण्यासाठी सक्षम बनवून आर्थिक समावेशाच्या उद्दिष्टाला पाठबळ देते, ज्याचे पर्यवसान ग्राहकांच्या आर्थिक कल्याणमध्ये होते.

त्या अनुषंगाने, राष्ट्रीय आर्थिक साक्षरता केंद्राने (NCFE) आर्थिक क्षेत्रातील नियामकांबरोबर सल्लामसलत करून, आर्थिक साक्षरता राष्ट्रीय धोरण (NSFE) 2020-25 तयार केले होते. भारत सरकार आणि वित्तीय क्षेत्र नियामकांच्या दृष्टीकोनाला समर्थन देणे हे त्याचे उद्दिष्ट असून, समाजाच्या विविध स्तरांमधील लोकांना आपल्या पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी आणि भविष्यासाठी योजना आखण्यासाठी आवश्यक असलेले आवश्यक ज्ञान, कौशल्ये, प्रवृत्ती आणि वर्तन विकसित करण्यासाठी सक्षम बनवते. 

या रणनीतीची विविध उद्दिष्टे आहेत, यामध्ये आर्थिक शिक्षणाद्वारे आर्थिक साक्षरतेच्या संकल्पना विकसित करून जीवन कौशल्य निर्माण करणे आणि बचतीच्या सक्रीय वर्तनाला प्रोत्साहन देणे, कर्ज घेण्याबाबतची शिस्त विकसित करणे, आणि आवश्यक असलेले कर्ज औपचारिक संस्थांकडून प्राप्त करणे, डिजिटल आर्थिक सेवांचा वापर सुधारणे, जोखीम व्यवस्थापन, ग्राहक हक्कांबाबत जागरुकता वाढवणे, ई. याचा समावेश आहे.

त्या अनुषंगाने, आरबीआय, लक्षित लोकसंख्येमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना करत आहे. या संदर्भात असाच एक प्रयत्न म्हणजे, 2023 मध्ये सरकारी शाळांमधील आठवी, नववी आणि दहावीच्या मुलांवर लक्ष केंद्रित करून, आर्थिक साक्षरतेवर अखिल भारतीय प्रश्नमंजुषा आयोजित करणे.  प्रभाग पातळीवर सुरू झालेल्या आणि जिल्हा आणि राज्य स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्दिष्ट, नव्याने विकसित होत असलेल्या डिजिटल नवोन्मेषासह, झपाट्याने बदलणाऱ्या जटिल जगात विद्यार्थी समुदायामध्ये आर्थिक साक्षरतेबाबत आवड निर्माण करणे, हे आहे.

 

 S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954176) Visitor Counter : 105


Read this release in: English