विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांचा नाविन्यपूर्ण जल व्यवस्थापन प्रकल्प 'तमारा' ("TAMARA") ला 89 लाख रुपयांचा निधी
Posted On:
31 AUG 2023 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2023
घटत्या जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याच्या आव्हानांना जग सामोरे जात असताना, भारत सरकारच्या विविध प्रयत्नांना आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत सरकारचा महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे अमृत (AMRUT) 2.0 मोहीम, ज्या मोहिमेचे विशिष्ट ध्येय आहे मौल्यवान जलस्रोतांचे जतन करणे आणि चक्रीय जल अर्थव्यवस्थेला चालना देणे. ही मोहीम दुहेरी उद्देश पूर्ण करते: जल संस्थांचे पुनरुज्जीवन करणे आणि पाण्याचा अपव्यय कमी करणे, आणि हे सर्व काही शहरी नियोजन धोरणे सुधारण्याच्या काळात. ही मोहीम नील अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत असून सागरी परिसंस्थेचे जतन करण्याबरोबरच आर्थिक विकासासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करण्यावर भर देते.
जलसंस्था व्यवस्थापनाच्या आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करत असताना, एक जबाबदार संस्था म्हणून तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) मेसर्स बॅरिफ्लो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड, ओडिशा या संस्थेच्या "डेव्हलपमेंट अँड कमर्शिलायझेशन ऑफ इंटेलिजेंट वॉटर बॉडी मॅनेजमेंट सिस्टम (आयडब्ल्यूएमएस -तमरा) (IWMS)-TAMARA) प्रकल्पाला सहकार्य करत आहे. मंडळाने या प्रकल्पासाठी 150.00 लाख रुपयांच्या एकूण प्रकल्प खर्चापैकी 89.00 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी सेन्सर्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) वर आधारित तंत्रज्ञानासह आधुनिक अशी स्मार्ट ऐयीरेशन प्रणाली या प्रकल्पाच्या नावीन्यपूर्णतेच्या केंद्रस्थानी आहे. असा हा आधुनिक दृष्टीकोन केवळ पाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या विद्यमान पद्धती सुधारत नाही तर जलस्रोत आणि जलसाठे प्रत्येकासाठी स्वच्छ आणि निरोगी राहतील याची देखील हमी देतो.
* * *
S.Thakur/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953713)
Visitor Counter : 148