संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

प्रविष्टि तिथि: 30 AUG 2023 6:19PM by PIB Mumbai

गोवा, 30 ऑगस्ट 2023

 

रॉयल सेकंडरी स्कूल, ताळगाव आणि मातृछाया स्कूल, फोंडा यांनी 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटर, बांबोळी-गोवा येथे सैनिकांसमवेत रक्षाबंधन साजरे केले.

रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि 3 टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंटचे शूर अग्निवीर उपस्थित होते.

   

विद्यार्थी आणि शिक्षकांनी देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अग्निवीर आणि शिक्षकांना रंगीबेरंगी राख्या बांधण्यात आल्या.

बहिणींनी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ तर भावांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू दिल्या. विद्यार्थी आणि अग्निवीरांच्या गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही याप्रसंगी आयोजन करण्यात आले होते.

 

* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1953551) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English