संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे एअरफोर्स स्टेशन येथे संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम (DCC) 2023 चे आयोजन

प्रविष्टि तिथि: 28 AUG 2023 7:23PM by PIB Mumbai

पुणे, 28 ऑगस्ट 2023

 

संरक्षण मंत्रालयाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील माध्यम संस्थांमधील  निवडक पत्रकारांसाठी आयोजित केलेला, तीन आठवडे कालावधीचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रमाचा (DCC) दुसरा टप्पा 28 ऑगस्ट 2023 रोजी एअर फोर्स स्टेशन, पुणे येथे सुरु झाला.  

  

एअर कमोडोर शेखर यादव, एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन पुणे यांनी उद्घाटनपर भाषण केले आणि अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या 34 पत्रकारांचे स्वागत केले. या उपक्रमाचा उद्देश, विशेषत: लष्करी क्षेत्राशी संबंधित विषयांवर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांमध्ये सशस्त्र दलांच्या कामाबद्दल सखोल माहिती आणि समज वाढवणे, हा आहे.

या अभ्यासक्रमामध्ये सहभागी पत्रकारांना हवाई दलाच्या विविध शाखांचे तज्ञ प्रशिक्षण देतील. हवाई दलाच्या मोहिमा , मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, तसेच भारतीय हवाई दलाची संघटनात्मक चौकट, यासारख्या विविध पैलूंवर हवाई दलाचे तज्ञ अधिकारी त्यांना विस्तृत माहिती देतील. अधिक समृद्ध अनुभव मिळवण्यासाठी सहभागी पत्रकार फायटर स्क्वाड्रन्स, एअर डिफेन्स स्क्वाड्रन्स आणि रिपेअर डेपोला देखील भेट देतील.  सहभागींना भारतीय हवाई दलाच्या कार्यान्वयनाबाबतचे पैलू आणि पायाभूत सुविधा घटकांची अनुभूती देण्यासाठी या भेटी आयोजित केल्या आहेत.

 

* * *

PIB Pune | S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1953032) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English