दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पेन्शन अदालत
Posted On:
28 AUG 2023 4:36PM by PIB Mumbai
गोवा, 28 ऑगस्ट 2023
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 53वी पेन्शन अदालत दिनांक 29-09-2023 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.
निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांची सेवेत असताना मृत्यु झालेली आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल.

पेन्शन अदालत मध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे,ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1952942)
Visitor Counter : 131