माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'जी-20' अजेंड्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक विकासासाठी गोव्यातील कौशल्य उणिवा भरून काढण्यासाठी आकाशवाणीकडून एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन

Posted On: 28 AUG 2023 3:52PM by PIB Mumbai

गोवा, 28 ऑगस्ट 2023

 

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि एस. एस. डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणी पणजी केंद्राने जी-20 अजेंड्याच्या अनुषंगाने वेगवान, सर्वसमावेशक आणि बळकट विकासाला चालना देण्यासाठी, गोव्यातील कौशल्य उणीवा दूर करण्याच्या उद्देशाने एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.

संजीत रॉड्रिग्ज, आयएएस, जी-20 चे नोडल अधिकारी; हरिलाल मेनन, गोवा विद्यापीठाचे कुलगुरु; गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे; आकाशवाणीचे उपमहासंचालक सुनील भाटिया; कार्यक्रम अधिकारी संजय पुनाळेकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

संजित रॉड्रिग्ज यांनी आपल्या भाषणात गोव्यात जी-20 परिषदेच्या आयोजनातून आलेले अनुभव मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना 'गोवा घोषणापत्रा'च्या तपशिलात जाऊन अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले. जी-20 पर्यटन बैठकीतून साध्य झालेल्या या डिक्लेरेशन मध्ये भविष्यातील पर्यटन विकासाची वाटचाल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या क्षमतेची रूपरेषा देण्यात आली आहे.

कुलगुरू हरिलाल मेनन यांनी 2010 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) इनोव्हेशनमुळे रोजगार क्षेत्रात आगामी काळात बदल होण्याची शक्यता वर्तवली. विद्यार्थ्यांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीनिवास धेंपे यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी अशा चर्चासत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. नव्या शैक्षणिक धोरणाशी (NEP) सांगड घालणे आणि विद्यार्थ्यांना आगामी नोकरीच्या संधींसाठी तयार करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

उत्पादन क्षेत्र (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री), आरोग्य (हेल्थ अँड वेलनेस) पर्यटन क्षेत्र, (टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी) आणि विमानतळ, बंदरे आणि पायाभूत सुविधा (एअरपोर्ट, पोर्ट अँड लॉजिस्टिक्स)' या विषयांवर माहितीपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

 

* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1952916) Visitor Counter : 111


Read this release in: English