नौवहन मंत्रालय
"ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट 2023" निमित्त नौवहन मंत्रालयाच्या हितसंबंधितांद्वारे मुंबईत रोड शो आयोजित
Posted On:
25 AUG 2023 9:08PM by PIB Mumbai
सागरी क्षेत्राला सहकार्यात्मक आणि शाश्वत विस्ताराकडे नेत असताना, आगामी "ग्लोबल मेरिटाइम इंडिया शो 2023" साठी भारत सरकारचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, नौवहन महासंचालनालय आणि भारतीय नौवहन महामंडळ यांनी संयुक्तपणे मुंबईत आज (25 ऑगस्ट, 2023) रोड शो आयोजित केला होता. या कार्यक्रमात सागरी उद्योगातील प्रणेते आणि सरकारी मान्यवरांचा सहभाग होता आणि जगभरातील 36 जहाजे, 10 देश आणि 2500 प्रतिनिधी तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काहीजण कार्यक्रमात सहभागी झाले
17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2023 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार्या मोठ्या अपेक्षा असणाऱ्या 3ऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट, 2023 (जीएमआयएस) ची हा 'रोड शो' नांदी होता. फिक्की (FICCI ) सोबत विशेष भागीदारीत आयोजित करण्यात आलेली ही शिखर परिषद 'जोडणे (कनेक्ट ) , सहकार्य (कोलॅबट)आणि निर्मिती (क्रिएट )' या सर्वांगीण संकल्पाने अंतर्गत संबंध , सहयोगी प्रयत्नांना आणि आशादायी नवोन्मेषला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, केंद्र आणि राज्यांच्या मजबूत सहकार्यावर आधारित सहकारी संघराज्यवादाच्या मंत्राने भारताची सागरी क्षमता वाढतच जाईल. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, “भारतीय सागरी उद्योगाच्या प्रगतीच्या प्रवासामधील, मुंबई रोड शो हे संपर्क वाढवण्याच्या, सहकार्याला जोपासण्यासाठी आणि आमच्या क्षेत्राला आणखी उच्च उंचीवर नेणारे मार्ग प्रकाशात आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे शक्तिशाली प्रतीक आहे.” ते पुढे म्हणाले, “मुंबई हा सागरी क्षेत्रातील उत्कृष्टतेच्या दिशेने जाणाऱ्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक मूलभूत आधारस्तंभ आहे. व्यापार, संपर्क वाढवणे आणि आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देणे, यामध्ये या प्रदेशाचे उल्लेखनीय योगदान आहे.
ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 (GMIS 2023):
GMIS 2023 हा भारताच्या सागरी क्षेत्रात संधी शोधण्यासाठी, आव्हाने समजून घेण्यासाठी आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी सागरी क्षेत्रावर केंद्रित कार्यक्रम आहे. सागरी क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमधील प्रदर्शक आणि गुंतवणूकदारांसह 100 पेक्षा जास्त देश आणि त्यांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
***
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
S.Bedekar/S.Chavan/R.Agashe/P.Kor
(Release ID: 1952320)
Visitor Counter : 88