कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय अन्वेषण विभागाने तत्कालीन सीमाशुल्क अधीक्षक आणि खाजगी कंपन्यांसह इतरांविरोधात गुन्हा नोंदवला तसेच छापे टाकले

Posted On: 23 AUG 2023 10:33PM by PIB Mumbai

मुंबई, 23 ऑगस्ट 2023

केंद्रीय अन्वेषण विभागाने जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस (जेएनसीएच), रायगड (महाराष्ट्र) च्या रोखे विभागाचे तत्कालीन अधीक्षक  आणि गोरेगाव, ठाणे येथील दोन खाजगी कंपन्या तसेच  अज्ञात इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने जेएनसीएचच्या अधिकार्‍यांसह जेएनसीएच, रायगड (महाराष्ट्र) च्या रोखे विभागात  यापूर्वी  संयुक्तपणे  अचानक भेट दिली होती.  खाजगी कंपन्यांशी संबंधित 2 बिल ऑफ एंट्रीच्या विरोधात 9,56,000/ रुपये आणि 4,96,000/ रुपये दंड  आकारण्यात आला होता आणि या 2 बिल ऑफ एंट्री अंतर्गत समाविष्ट  वस्तू सीमाशुल्क गुप्तहेर विभागाने ठेवून घेतल्या होत्या.

दोन्ही खाजगी कंपन्यांनी अवाजवी फायदा घेऊन संबंधित अधीक्षक, रोखे  विभाग, जेएनसीएच, रायगड आणि इतरांसोबत कट रचला आणि देय रक्कम न भरता या 2 बिल ऑफ एंट्री अंतर्गत समाविष्ट असलेल्या वस्तू दंड न भरता मिळवल्याचा  आरोपही करण्यात आला. यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले आहे .

नवी मुंबई, नोएडा , सीतापूर, गोरेगाव आणि ठाणे येथे आरोपींच्या निवासस्थानी  छापे टाकण्यात आले .

अधिक तपास चालू आहे.

 S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951582) Visitor Counter : 84


Read this release in: English