विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सागरी सुरक्षा आणि वैज्ञानिक अन्वेषणाचा अनोखा संगम: सीएसआयआर-एनआयओची भारतीय तटरक्षक दलाप्रती कृतज्ञता
Posted On:
23 AUG 2023 6:05PM by PIB Mumbai
गोवा, 23 ऑगस्ट 2023
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (सीएसआयआर-एनआयओ), गोवा यांनी 22 ऑगस्ट रोजी सागरी सुरक्षा कर्मचारी आणि वैज्ञानिक शोधक यांना एकत्रित आणून संवादाचे आयोजन केले होते. जुलै 2023 मध्ये एसएसडी -087 मोहिमेदरम्यान एनआयओचे संशोधन जहाज आरव्ही सिंधू साधनेची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल भारतीय तटरक्षक दलाचा (आयसीजी) सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात समुद्रशास्त्रज्ञ आणि सागरी संरक्षक यांचा अनोखा संगम दिसून आला.
जुलै महिन्यात एसएसडी -087 मोहिमेदरम्यान आर व्ही सिंधू साधना या संशोधन नौकेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आयसीजीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट होते. एनआयओच्या संचालकांनी आयसीजीएस "सुजीत"च्या कमांडिंग ऑफिसर आणि क्रू मेंबर्सचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू एक संवाद सत्र होता, ज्या दरम्यान वैज्ञानिक संशोधकांनी ब्लू इकॉनॉमी पुढे नेण्यासाठी आलेले त्यांचे उल्लेखनीय अनुभव आणि आव्हाने यावर विचारांचे आदान प्रदान केले. वैज्ञानिक समुदाय आणि तटरक्षक दल यांच्यातील ज्ञानाची ही देवाणघेवाण सागरी क्षेत्रात भारताच्या समृद्धीला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या कार्यक्रमात सीएसआयआर-एनआयओ आणि भारतीय तटरक्षक दल यांच्यातील समन्वयाचे दर्शन घडवले गेले आणि भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सहकार्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला.
भारतीय तटरक्षक दलाने धाडसी बचाव कार्यादरम्यान केलेल्या तत्पर आणि कार्यक्षम प्रतिसादामुळे 36 जणांचे प्राण तर वाचलेच, शिवाय संभाव्य पर्यावरणीय आपत्ती टळली. 26 जुलै रोजी सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या मालकीचे 'सिंधू साधना' हे संशोधन जहाज संकटात सापडले होते आणि आठ शास्त्रज्ञ आणि एकूण 36 जणांच्या क्रूला घेऊन कारवारच्या दिशेने धोकादायकरित्या जहाजाचा प्रवास होत होता, तटरक्षक दलाने यशस्विरीत्या या जहाजाला वाचवून संभाव्य हानी टाळली.
PIB Panaji/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1951469)
Visitor Counter : 105