संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय तटरक्षक दलाबरोबर द्विपक्षीय बैठकीसाठी फिलिपिन्सच्या तटरक्षक दलाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाची गोव्याला भेट

Posted On: 21 AUG 2023 8:35PM by PIB Mumbai

गोवा, 21 ऑगस्ट 2023

 

भारतीय तटरक्षक दलाबरोबर (आयसीजी) गोव्यामध्ये आयोजित द्विपक्षीय बैठकीसाठी फिलिपिन्सच्या तटरक्षक दलाचे कमांडंट सीजी अॅडमिरल आर्टेमियो मनालो अबू यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने 21 ऑगस्ट रोजी गोवा येथे भेट दिली. 

आपल्या भेटीदरम्यान या शिष्टमंडळाने गोवा तटरक्षक दलाच्या, जिल्हा 11 इथल्या मुख्यालयाला भेट देऊन आयसीजी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, आणि आयसीजीएस सुजीत या खोल समुद्रातील गस्ती नौकेसह भारतीय तटरक्षक दलाच्या इतर सुविधांचा दौरा केला.

जीएसएलला भेट, तसेच  HAL द्वारे ALH MK3 हेलिकॉप्टरवर  सीडीएफ   याद्वारे   शिष्टमंडळाला , भारतीय जहाज बांधणी आणि एरोस्पेस उद्योग क्षमतेचे दर्शन घडवण्यात आले. ALH MK3 हे बहु उपयोगी  हेलिकॉप्टर असून, ते शोध आणि बचाव,  आणि सागरी देखरेख यासह विविध मोहिमा पार पाडण्यासाठी सक्षम आहे.   

शिष्टमंडळाने गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL), या भारतातील आघाडीच्या जहाज बांधणी कंपन्यांपैकी एक असलेल्या उद्योगाला भेट दिली. गोवा शिपयार्ड लिमिटेड सध्या भारतीय तटरक्षक दल आणि नौदलासाठी अनेक जहाजांची बांधणी करत आहे. फिलिपिन्स तटरक्षक दल (PCG) देखील आपली सागरी क्षमता वाढवण्यासाठी नवीन मालमत्ता आणि तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

ही भेट भारत-फिलिपिन्स सहकार्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांचे सागरी संबंध अधिक दृढ होतील आणि प्रादेशिक सहकार्याला चालना मिळेल, अशी आशा आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे हे पुढले पाउल ठरेल.

 

* * *

PIB Panaji | N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1950909) Visitor Counter : 85


Read this release in: English