ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
एफ सी आय अर्थात भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाद्वारे, खुला बाजार विक्री योजना (स्थानिक) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2023 6:47PM by PIB Mumbai
भारतीय अन्न महामंडळ, प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र यांनी ओएमएसएस (डी) अर्थात खुला बाजार विक्री योजना (स्थानिक) अंतर्गत, जून 23 च्या शेवटच्या आठवड्यापासून (28 जून 2023) गहू आणि तांदूळ, विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.
गहू आणि तांदूळ साठा खरेदी करु इच्छिणारे खरेदीदार, एफ सी आय च्या "m-Junction Services Limited" (https://www.valuejunction.in/fci/ ) या ई-लिलाव सेवा प्रदाता सुविधेवर स्वतःची नावनोंदणी करून खरेदीसाठी बोली लावू शकतात. खरेदीदारांच्या नावनोंदणीची आणि खरेदीदार म्हणून नोंदणीकृत होण्याची संपूर्ण प्रक्रिया, 72 तासांच्या आत पूर्ण केली जाईल. प्रक्रिया उद्योजक/पीठ गिरण्या/गहू उत्पादनांचे उत्पादक आणि व्यापारी/घाऊक खरेदीदार/तांदूळ उत्पादक, यामध्ये सहभागी होऊ शकतात. 23.08.2023 रोजी होणाऱ्या लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशातील 25 गोदामांतून 10000 मेट्रिक टन गव्हाचा आणि 34 गोदामांतून 20000 मेट्रिक टन तांदूळाचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ओएमएसएस (डी) योजनेमुळे, वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळून, सर्वसामान्यांना मोठा दिलासाही मिळू शकेल.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950662)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English