दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

नवी मुंबई विभागात येत्या 31 ऑगस्ट रोजी पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात, 53वी पेंशन अदालत आयोजित

Posted On: 17 AUG 2023 1:42PM by PIB Mumbai

पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र, पनवेल यांच्या वतीने गुरुवार, 31 ऑगस्ट 2023 रोजी "पोस्टमास्तर जनरल कार्यालय, नवी मुंबई क्षेत्र, दुसरा मजला, पनवेल एचओ बिल्डिंग, नवीन पनवेल, रायगड 410206" येथे दुपारी 12.00 वाजता टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी/कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी (जे सेवानिवृत्त आहेत किंवा नवी मुंबई क्षेत्रांतर्गत कार्यालयातून निवृत्तीवेतन घेत आहेत) 53 वी पोस्टल पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालतीसाठी निवृत्तीवेतनधारक आपले अर्ज लेखाधिकारी कार्यालय, पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र, दुसरा मजला, पनवेल HO बिल्डिंग, नवीन पनवेल, रायगड-410206 या पत्त्यावर 24 ऑगस्ट 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवू शकतात. 24-08-2023  नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे उदाहरणार्थ उत्तराधिकार/वारसा हक्क, राष्ट्रीय पेन्शन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही

भारतीय डाक विभाग

डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा नमुना

क्र.

 

विषय

व्यक्ती / निवृत्तिवेतनधारक यांनी भरायचे तपशील

1.

निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामासह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव

 

2.

जिथून निवृत्त झाले आहेत त्या कार्यालयाचे नाव आणि निवृत्तीची तारीख

 

3.

निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाचा पीपीओ क्रमांक

 

4.

जिथून पेन्शन घेतली जाते त्या टपाल कार्यालयाचे आणि विभागाचे नाव

 

5.

निवृत्तिवेतनधारक / कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक

 

6.

तक्रार थोडक्यात सांगून तक्रारीचा दिनांक आणि स्वाक्षरी (जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)

 

7.

व्यक्ती/निवृत्तिवेतनधारक/कौटुंबिक निवृत्तिवेतनधारकाची स्वाक्षरी आणि दिनांक

 

 

****

Sonal T/Bhakti S/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949806) Visitor Counter : 88


Read this release in: English