वस्त्रोद्योग मंत्रालय
एनआयएफटी मुंबई स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानिमित्त आयोजित सांस्कृतिक समारंभातून स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान आणि देशाच्या प्रगतीचा उत्सव
स्वातंत्र्यदिनानिमित्त एनआयएफटी मुंबईत, रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2023 8:01PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2023
आज देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एनआयएफटी मुंबईतील विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमातून, देशातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले आणि देशाच्या प्रगतीचा उत्सवही साजरा केला. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी, एकता आणि विविधतेचे प्रदर्शन करत, स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याशिवाय, रक्तदान शिबिर देखील आयोजित करत, एकता, करुणा आणि समाजाप्रतीचा सेवाभाव दर्शवला.

एनआयएफटी मुंबई चे संयुक्त संचालक, कुशल जांगिड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने आजूबाजूचा परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने दुमदुमला.
त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात, देशभक्तीपर गीतांसाठी एकत्र येत, विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान देणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. एनआयएफटी मुंबईच्या म्युझिक सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाविषयीच्या भावना, बलिदान आणि अभिमानाच्या गाथा गीतातून जिवंत केल्या.
त्यानंतर देशभक्तीपर गीत स्पर्धा घेण्यात आली ज्यात विद्यार्थ्यांनी उत्कट भावाने आपले गायन कौशल्य दाखवत, वेगवेगळ्या कालखंडातली तसेच वेगवेगळ्या शैलींतली देशभक्ती आणि एकतेचा संदेश देणारी गाणी सादर केली.
फॅशन कम्युनिकेशन विभागाचा सातव्या सेमिस्टरचा विद्यार्थी अक्षत अमन याने आपल्या प्रभावी कविता वाचनातून देशाचा भारताचा समृद्ध वारसा, नैसर्गिक संपदा आणि सांस्कृतिक विविधता समोर आणली. त्याच्या ह्या प्रभावी काव्यगायनामुळे उपस्थितांमध्ये, अभिमान आणि एकतेची भावना निर्माण झाली.
E0OU.jpg)
ह्या कार्यक्रमात प्रेक्षकांना खिळवून करणारी नृत्यनाटिका देखील सादर करण्यात आली. राष्ट्राची सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यासाठी समर्पित राष्ट्रीय गुप्तहेरांचे जग उलगडून दाखवणारी ही नाटिका अतिशय प्रभावी ठरली. एनआयएफटी मुंबईच्या “आगाह” या नाट्यसंस्थेच्या विद्यार्थ्यांनी या नाटीकेचे दिग्दर्शन केले होते. एनआयएफटी मुंबईच्या ‘अफरोजा” नृत्यसंस्थेच्या सदस्यांनी बसवलेल्या नृत्यातून देशभक्ती आणि सशस्त्र दलांबद्दल आदराची भावना व्यक्त करण्यात आली.
* * *
PIB Mumbai | JPS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1949194)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English