रेल्वे मंत्रालय
पश्चिम रेल्वेने साजरा केला 77 वा स्वातंत्र्यदिन
Posted On:
15 AUG 2023 5:40PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2023
पश्चिम रेल्वेने 77 वा स्वातंत्र्यदिन आपल्या चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे आरोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाची औपचारिक परेड झाली. मिश्रा यांनी उपस्थितांना संबोधित करून रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पश्चिम रेल्वेचे प्रमुख सुरक्षा आयुक्त पी. सी. सिन्हा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांचे स्वागत केले. यावेळी पश्चिम रेल्वेच्या महिला कल्याण संस्थेच्या (WRWWO) अध्यक्ष श्रीमती क्षमा मिश्रा, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारीही उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात, महाव्यवस्थापक मिश्रा यांनी उपस्थितांना पश्चिम रेल्वेने नुकत्याच सुरू केलेल्या योजना आणि त्यांचे टप्पे याची माहिती दिली. ज्यांनी आपल्या पराक्रमाने आणि बलिदानाने आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यलढ्यातील सर्व वीरांना आदरांजली आणि पुष्पांजली वाहत आपण आपल्या देशाला अधिक विकसित आणि समृद्ध करत आहोत, असे मिश्रा यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
आपल्या भाषणाच्या अखेरीस कर्मचार्यांना, कठोर परिश्रम सुरू ठेवावेत, आणि नेहमीच उत्कृष्टतेचा शोध घ्यावा, असे सांगत त्यांनी सर्वांना प्रेरित केले. यामुळे उद्दिष्टे पूर्ण करण्यात आणि पश्चिम रेल्वेला नवीन उंचीवर नेणारे अपेक्षित परिणाम साध्य करण्यास मदत होईल. महाव्यवस्थापक मिश्रा यांनी पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या मुंबई विभागाच्या विशेष गुप्तचर शाखेतील उपनिरीक्षक हिम्मतसिंग नाथवत, सहायक उपनिरीक्षक, भुज शाखा, भुनेश कुमार श्रीवास्तव यांचे गुणवंत सेवेसाठी प्रतिष्ठित भारतीय पोलीस पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

पश्चिम रेल्वे महिला कल्याण संस्था (WRWWO) अध्यक्षा -श्रीमती क्षमा मिश्रा - यांनी यावेळी जगजीवन राम रुग्णालयासाठी, पश्चिम रेल्वेच्या प्रमुख वैद्यकीय संचालक डॉ. हाफीजुन्निसा यांच्याकडे स्वयंपाक घरातील उपयुक्त वस्तू भेटीदाखल सुपूर्द केल्या.
या प्रसंगी, पश्चिम रेल्वेने साधलेले यश आणि विलक्षण टप्पे दाखविणारा “आझादी के रंग पश्चिम रेल्वे के संग” हा लघुपट सादर करण्यात आला. रेडिओ सिटीच्या सहकार्याने बनवलेली गीते “मेरी माती, मेरा देश; माती को नमन, वीरों का वंदन” सादर करण्यात आली. यानंतर अनेक देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादरीकरणासह सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
* * *
PIB Mumbai | S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949121)
Visitor Counter : 113