सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

नागपुरात दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण संबंधी संयुक्त प्रादेशिक केंद्र (सीआरसी) द्वारे स्वातंत्र्य दिन साजरा

Posted On: 15 AUG 2023 5:20PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण संबंधी संयुक्त प्रादेशिक केंद्र (सीआरसी ), नागपूरने आपल्या सर्व दिव्यांगजन  कुटुंबियांसह 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.

  

सीआरसी नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी सर्व कर्मचारी आणि सीआरसी नागपूरचे लाभार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. पालक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना राजेंद्र मेश्राम यांनी निरामय योजना आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. सीआरसी नागपूर हे निरामय योजनेचे सुविधा केंद्र आहे. चालू वर्षासाठी, जवळपास 50-57 लाभार्थींची नॅशनल ट्रस्ट कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाभार्थ्यांना निरामय योजनेच्या 22 स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्डच्या मदतीने त्यांना 1 लाखांपर्यंतचा निरामय आरोग्य विमा मिळू शकतो. नॅशनल ट्रस्ट कायद्यांतर्गत निरामय आरोग्य विम्याचा लाभ बहुविकलांग, बौद्धिकदृष्ट्या विकलांग , सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझम स्पेक्ट्रम विकार  असलेल्या मुलांना  मिळू शकतो.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949085) Visitor Counter : 120


Read this release in: English