रेल्वे मंत्रालय
मध्य रेल्वेने साजरा केला 77वा स्वातंत्र्य दिन
मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
Posted On:
15 AUG 2023 5:15PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2023
77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी मध्य रेल्वेचे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ध्वजारोहण केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नरेश लालवानी यांनी सर्व रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि आदरणीय प्रवाशांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रेल्वेने देशाची एकात्मता वाढवून, नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली, असे ते यावेळी म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा रेल्वे परिसर आणि गाड्या साक्षीदार आहेत. ‘हर घर तिरंगा’ याचा एक भाग म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनीही आपल्या घरांमधून राष्ट्रध्वज लावला आहे. त्यांनी 2022-23 आणि 2023-24 च्या पहिल्या चार महिन्यांत होणाऱ्या मध्य रेल्वेच्या कामगिरीची माहिती उपस्थितांना दिली.
नरेश ललवाणी यांनी प्रदीप लोखंडे उपनिरीक्षक आरपीएफ, नागपूर यांचे भारतीय पोलीस पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
त्यानंतर नरेश ललवाणी आणि मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभना ललवाणी यांनी भायखळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या विविध सेवासुविधांचे उद्घाटन केले.
रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभना ललवाणी तसेच त्यांचे इतर सदस्य, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि विविध विभागांचे प्रमुख आलोक सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग रजनीश कुमार गोयल, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या समारंभाला उपस्थित होते. मध्य रेल्वेच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलवर स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
* * *
PIB Mumbai | S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949080)
Visitor Counter : 116