रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ने नवी मुंबई मधील नेरुळ येथील कोकण रेल्वे विहार येथे स्वातंत्र्यदिन केला साजरा

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2023 11:57AM by PIB Mumbai

स्वातंत्र्य दिनानिमित्त, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथील कोकण रेल्वे विहार येथे राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि त्यानंतर कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाद्वारे संचलन पार पडले.

यावेळी उपस्थित कोकण रेल्वेच्या उत्साही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना संजय गुप्ता यांनी महामंडळाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि समर्पणाची प्रशंसा केली. हीच गती कायम राखण्याची आणि महामंडळाच्या विकास आणि भरभराटीसाठी असेच योगदान देण्यावर त्यांनी भर दिला.

कोकण रेल्वेने भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना "मिट्टी को नमन, वीरों का वंदन," टॅगलाईनसह "मेरी माटी मेरा देश" आणि "जन भागीदारी" या तत्वांचा अवलंब केला. "मेरी माटी मेरा देश" द्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्राच्या अनेक महत्वपूर्ण उपलब्धी साजऱ्या केल्या जात आहेत. या चळवळीचा एक भाग म्हणून, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पंचप्रण प्रतिज्ञा दिली.

प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी आणि भारताच्या प्रगतीच्या प्रवासाच्या सन्मानार्थ सर्व कर्मचाऱ्यांना भारतीय ध्वजाचे वितरण करण्यात आले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात आलेल्या #HarGharTiranga उपक्रमाने कर्मचार्‍यांना देशाच्या वारसाशी खोलवर रुजलेले नाते अधिक बळकट करत त्यांच्या घरी अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहित केले. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी आणि कारवार भागातही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

***

NJ/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1948850) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English