दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दूरसंचार विभागामार्फत पेन्शनधारक आणि परवानाधारकांसाठी कल्याणकारी उपक्रमांचं आयोजन

Posted On: 15 AUG 2023 10:35AM by PIB Mumbai

आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत, 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (14 ऑगस्ट,) महाराष्ट्र आणि गोवा येथील कम्युनिकेशन अकाउंट्सच्या नियंत्रक विभा जी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागीय कार्यालयात पेन्शनधारक आणि परवानाधारकांसाठी कल्याणकारी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. राधाकृष्ण रुग्णालय आणि संशोधन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दूरसंचार विभाग आणि बीएसएनएल, अर्थात भारत दूरसंचार निगम लिमिटेड तर्फे पेन्शनधारकांच्या फायद्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या पथकाने वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या आणि पेन्शनधारकांना वैद्यकीय सल्ला दिला. शिबिरात पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याव्यतिरिक्त अन्य नागरिकांनीही वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी पेन्शनर्स संवादही आयोजित करण्यात आला होता, त्यात पेन्शनधारकांच्या शंका आणि समस्यांचे निराकरण करण्यात आले. डिजीटल लाइफ प्रमाणपत्रासाठी समर्पित केंद्र उभारण्यात आले होते, जिथे अनेक पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्रे अपडेट केली.

नागपूर विभागातील इंटरनेट सेवा प्रदात्यांच्या फायद्यासाठी परवानाधारक पोहोच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यांना SARAS च्या कार्याबाबत शिक्षित करणे, लेखापरीक्षित कागदपत्रे सादर करणे, परवाना शुल्क भरणे इत्यादी परवानाधारकांशी संबंधित इतर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर शहरातील सुमारे 15 परवानाधारक या अधिवेशनाला उपस्थित होते. संयुक्त नियंत्रक शहांक भारद्वाज, आर.एस. वारंग, डेप्युटी सी सी ए डॉ, नेहा किर्दक, सहाय्यक, सहायक अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी तसंच विविध नागरिकांनी आणि संस्थांनी यात सहभागी झाले.

***

Sonal T/Shailesh M/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948822) Visitor Counter : 128


Read this release in: English