कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीआय मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा चषक


उत्कृष्ट सेवेसाठी 60 सीबीआय अधिकाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

Posted On: 12 AUG 2023 7:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI), मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOB) आज 12 ऑगस्ट, 2023 रोजी दिल्लीतील मुख्यालयात आयोजित केलेल्या अलंकरण  समारंभात सर्वोत्कृष्ट शाखेसाठी दिवंगत  एस.के. पलसानिया स्मृती चषक प्रदान करण्यात आला. चंदिगडमधील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच चेन्नईमधील सीबीआयचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी संयुक्तपणे उपविजेत्या शाखेला दिला जाणारा एच.सी.सिंग स्मृती चषक पटकावला. विभागाच्या 60 अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदकेही प्रदान करण्यात आली. या विशेष समारंभात भारताचे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्या हस्ते विजेत्यांना चषक आणि पदके प्रदान करण्यात आली.

आर. व्यंकटरमणी यांनी या प्रसंगी बोलताना पदक विजेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांनीही पदक विजेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि पदक विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948219) Visitor Counter : 127
Read this release in: English