सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समाजाच्या विविध स्तरातील विशेष अतिथींना निमंत्रण


व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छिमारांना स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण

महाराष्ट्रातील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे चार लाभार्थी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार

यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रमाला देशभरातील सुमारे 18,00 विशेष निमंत्रित उपस्थित राहणार

Posted On: 10 AUG 2023 7:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई, 10 ऑगस्ट 2023

भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी  75 वर्षे पूर्ण होत असताना, व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छिमार, नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणारे कामगार, खादी क्षेत्रातील कामगार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शालेय शिक्षक, सीमा रस्ते संघटना कामगार आणि देशाच्या विविध भागात अमृत सरोवर प्रकल्पासाठी आणि हर घर जल योजना प्रकल्पासाठी काम करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्ती या सर्वांना त्यांच्या  जोडीदारासोबत यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे चार लाभार्थी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. या योजनेच्या 50 लाभार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसोबत 1800 व्यक्तींमध्ये समावेश आहे ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून होणारे भाषण ऐकण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.देशभरातील समाजाच्या विविध स्तरातील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्याचा हा उपक्रम सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून आहे.

या विशेष निमंत्रितांपैकी एक असलेले अक्षय ऊईके हे गडचिरोली जिल्ह्यातील चटगावचे रहिवासी आहेत. बांबूच्या पारंपरिक वस्तूंची विक्री करण्याचा त्यांचा एक घरगुती व्यवसाय असून यामधून त्यांना दिवसाला 300 रुपये उत्पन्न मिळते. ऊईके यांनी सरकारच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की नवी दिल्लीमध्ये होत असलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे. हे निमंत्रण दिल्याबद्दल आपण अतिशय आनंदित झालो असून याबद्दल पंतप्रधानांचे, त्याबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नागपूरचे विकास आणि सुविधा कार्यालय यांचे ऋणी आहोत, असे ऊईके यांनी सांगितले.

‘अक्षय ऊईके बांबूच्या वस्तू तयार करत आहेत.’

एमएसएमई मंत्रालयाचे आणखी एक विशेष निमंत्रित शुभम सातपुते महाराष्ट्रामधील कोल्हापूरचे असून त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, एमएसएमई विभागाने सुरू केलेल्या, चेन्नईच्या प्रतिष्ठेच्या सेंट्रल फूटवेअऱ ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या बहुमूल्य अभ्यासक्रमाचे आपण प्रशिक्षण घेतले आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरी चपलांविषयीच्या माझ्या दृष्टीकोनामध्ये बदल घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मेमरी फोम्स, आकर्षक रंग आणि घसरण्याला प्रतिबंध करणारे पायताण तळ यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करून मी कोल्हापुरी चपलांचा प्राचीन वारसा कायम राखत पारंपरिक कारागिरीला आधुनिकतेची आणि आकर्षकतेची जोड दिली आहे. 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशातील उद्यमशील युवा वर्गात कौशल्याचा विकास करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

***

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1947584) Visitor Counter : 107


Read this release in: English