इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी : सुरक्षित आणि सोयीस्कर ओळख पडताळणी पद्धतीची नवी व्याख्या

Posted On: 10 AUG 2023 4:25PM by PIB Mumbai

मुंबई, 10 ऑगस्ट 2023

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) नागरिकांसाठी ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी ही अत्यंत क्रांतिकारी सुविधा असून ही सुविधा गोपनीयता, सुरक्षितता आणि सर्वसमावेशकता यांचे संरक्षण करतानाच, आधार क्रमांक धारकांना विविध व्यवहारांमध्ये सुलभतेने आणि सुरक्षितपणे त्यांची ओळख प्रस्थापित करण्यात मदत करते.

आजच्या डिजिटल युगात, असंख्य व्यवहार आणि सेवांसाठी ओळख पडताळणी केली जाणे हा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. यासंदर्भात युआयडीएआयने प्रत्येकाच्या व्यक्तिगत गोपनीयतेचा आदर करणाऱ्या आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या, सुव्यवस्थित तसेच सुरक्षित प्रक्रियेची गरज ओळखली आहे. आणि म्हणूनच या समस्येवर उपाय शोधणे तसेच कार्यक्षम, वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टीकोन स्वीकारणे या उद्देशाने नाविन्यपूर्ण उपाययोजना म्हणून आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसीची सुरुवात करण्यात आली. ही सुविधा ओळख पडताळणी प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडवून या प्रक्रियेला अधिक वापरकर्ता-केंद्रित, सुरक्षित आणि विविध प्रकारच्या परिस्थितींमध्ये स्वीकारार्ह स्वरूप देणार आहे. या अभिनव सुविधेतून नागरिकांची गोपनीयता आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाईल याची सुनिश्चिती करतानाच, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत घडामोडींमध्ये आघाडीवर राहण्याप्रती युआयडीएआयची वचनबद्धता दिसून येते.

युआयडीएआयच्या ऑनलाइन केवायसी सेवा अत्यंत जलद आणि प्रमाणीकृत ओळख पडताळणीची सोय उपलब्ध करून देते मात्र या प्रक्रियेला काही प्रमाणात मर्यादा असून त्यामुळे ही प्रक्रिया सर्वच संस्था किंवा व्यक्तींसाठी उपयुक्त ठरत नाही. ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया अखंडित कनेक्टीव्हिटीवर अवलंबून असते आणि अनेकदा विविध ठिकाणी किंवा परिस्थितींमध्ये अशी सुविधा मिळणे शक्य होत नसते. तसेच ऑनलाइन ई-केवायसी सेवांचा वापर करण्यासाठी संस्थांकडे विशिष्ट तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे आणि काही उपकरणांचा वापर करणे आवश्यक असते. त्याशिवाय, ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया वापरताना कधीकधी बायोमेट्रिक माहिती पुरवणे आवश्यक असते, आणि वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी ही माहिती देणे शक्य होत नसते.

आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी सुविधेचे अनेक फायदे आहेत. आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी ही सुविधा व्यक्तींना, युआयडीएआयच्या सहभागाशिवाय, त्यांची केवायसीविषयक माहिती थेट सामायिक करण्याची क्षमता प्रदान करते. यामुळे माहितीच्या सामायीकीकरणावर संपूर्ण नियंत्रण असल्याची खात्री मिळते आणि गोपनीयतेची सुनिश्चिती होते. सुरक्षितताविषयक सुधारित वैशिष्ट्यांसह, माहितीशी छेडछाड होणे रोखण्यासाठी, आधार क्रमांक धारकाने डाऊनलोड केलेली आधार केवायसी माहिती युआयडीएआयतर्फे डिजिटली स्वाक्ष्यांकित करण्यात येते. माहितीच्या अधिकृततेची खात्री करून घेण्यासाठी संस्था त्यांच्या स्वतःच्या ओटीपीचा / चेहेरा प्रमाणीकरण प्रक्रियांचा वापर करु शकतात. आधार क्रमांक धारकाला त्यांची माहिती आणि छायाचित्र यांच्यासह कोणती माहिती सामायिक करण्याची इच्छा आहे याची निवड करण्याची लवचिकता या सुविधेद्वारे मिळते. अंतिमतः, ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेत असते तशी मुलभूत बायोमेट्रिक माहिती (हातांचे ठसे किंवा डोळ्याचे बुबुळ) उपलब्ध असण्याची गरज आधार कागदविरहित ऑफलाईन ई-केवायसी सुविधेमध्ये लागत नाही.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1947460) Visitor Counter : 118


Read this release in: English