विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर- राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान युसूफ हमीद रसायनशास्त्र शिबिराचे आयोजन

Posted On: 07 AUG 2023 2:32PM by PIB Mumbai

गोवा, 7 ऑगस्ट 2023

 

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी), इंडिया आणि गोव्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय विशेष रसायनशास्त्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 8 ते 10 ऑगस्ट या कालावधीत सीएसआयआर-एनआयओ येथे होणार आहे. विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन आणि समजून घेण्यास मदत करणे हे या शिबिराचे उद्दीष्ट आहे. विविध शाखेतील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या उपक्रमांविषयी संशोधन आणि विद्यापीठ स्तरावरही रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याची या निवासी शिबिरातून संधी मिळणार आहे.

रसायनशास्त्र शिबिर आरएससी युसूफ हमीद प्रेरणादायी विज्ञान कार्यक्रमाचा एक भाग आहे, जे सीएसआयआर-एनआयओद्वारे आयोजित करण्यात आले आहे. यात 'जिज्ञासा कार्यक्रम'  उपक्रमात  गोव्यातील सुमारे 35 शाळांमधील 70 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमांतर्गत 2015 पासून देशात अशा प्रकारची 48 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली आहेत. ही शिबिरे विविध शाळांमधील 2500 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून त्यात वंचित घटकातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम शिक्षकांनाही उपयुक्त ठरत आहे, विविध कार्यशाळांच्या माध्यमातून 40,000 पेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

या शिबिरांमागील प्रेरणा म्हणजे मुंबईतील सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन युसूफ हमीद यांची आहे. त्यांच्या वडिलांनी 1935 मध्ये स्थापन केलेली ही कंपनी एड्स आणि कोविड-19 सारख्या आजारांवर परवडणारी जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ओळखली जाते.

 

* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1946342) Visitor Counter : 109


Read this release in: English