माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाद्वारे 1960 सालच्या 'बरसात की रात' या दर्जेदार चित्रपटाचे पुनर्संकलन, भारतीय चित्रपटविषयक राष्ट्रीय संग्रहालयात शनिवारी प्रथम सार्वजनिक प्रदर्शन

Posted On: 04 AUG 2023 8:00PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 4 ऑगस्ट 2023

 

मधुबाला आणि भारत भूषण यांच्या प्रमुख भूमिका असलेला 1960 सालातील 'बरसात की रात' हा दर्जेदार चित्रपट भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 35 मिमी मास्टर पॉझिटिव्हमधून डिजीटल आणि पुनर्संकलित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे निधी प्राप्त राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा एक भाग म्हणून, पुनर्संकलन प्रकल्पाअंतर्गत एनएफएआय द्वारे पुनर्संकलन केलेला हा पहिला चित्रपट आहे.

चित्रपटाची मूळ प्रिंट 46 वर्षांहून अधिक काळ संग्रहालयाने जतन केली होती. एनएफएआयच्या प्रशिक्षित चित्रपट पुनर्संकलन तज्ज्ञ गटाने मूळ प्रिंट डिजीटल करण्यासाठी महिनोंमहिने खूप मेहनत घेतली. अत्याधुनिक अर्काइव्हल फिल्म स्कॅनरसह, ARRISCAN XT वर 4K रिझोल्यूशनमध्ये, 35mm मास्टर पॉझिटिव्ह अत्यंत काळजीपूर्वक स्कॅन केले गेले. यानंतर चित्र आणि ध्वनी  दोन्हीचे डिजिटल पुनर्संचयन करण्यात आले. पुनर्संकलन करताना प्रत्येक फ्रेमवर, चरे, धूळ, उभ्या रेषा, हेवी फ्लिकर, स्प्लाईस मार्क्स, हिस, गोंगाट आणि पॉप यांसारखे दोष वेळोवेळी लक्षात घेऊन ते निवारणार्थ परिश्रमपूर्वक काम केले गेले. यामुळे समकालीन चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांना चित्रपटाचा अनुभव घेता येईल, ज्याप्रमाणे तो चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी प्रेक्षकांनी घेतला होता.

पी.एल. संतोषी दिग्दर्शित सांगीतिक कथेत, एक कवी-गायक अमन (भारत भूषण),आणि एका पावसाळी रात्री त्याला अचानक भेटणारी स्त्री शबनम (मधुबाला) यांच्यातील प्रेम उलगडत जाते. तिच्या पालकांनी त्यांच्या मीलनाला विरोध केल्यामुळे, अमन हैदराबादहून लखनौला प्रस्थान करतो, जिथे तो कव्वाली रचना आणि स्पर्धांच्या लोकप्रिय दुनियेत प्रवेश करतो. साहिर लुधियानवी यांची गीतरचना आणि रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाचे संगीत आणि मन्ना डे, मोहम्मद रफी, लता मंगेशकर व  आशा भोसले या पार्श्वगायकांनी गायलेल्या गीतांना चित्रपट आणि संगीत रसिकांनी भरभरून दाद दिली होती. 

हा चित्रपट त्याच्या नवीन डिजीटल स्वरूपात, चित्रपट चाहत्यांसाठी शनिवारी, 5 ऑगस्ट, 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NMIC) येथे पहिल्यांदाच प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाचे प्रदर्शन केवळ NMIC अभ्यागतांसाठी केले जात आहे. या शनिवारी NMIC ला भेट देणार्‍यांसाठी हा दुहेरी आनंद आहे, कारण ते संग्रहालयात भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचे साक्षीदारच नाही तर त्याच आवारात त्यांचे NMIC तिकीट वापरून पुनर्संकलित केलेला उत्कृष्ट चित्रपट देखील पाहू शकतात!

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945918) Visitor Counter : 89


Read this release in: English