दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
"हर घर तिरंगा" मोहिमेसाठी टपाल खात्यात मिळणार 25 रुपयाला राष्ट्रध्वज
Posted On:
04 AUG 2023 2:26PM by PIB Mumbai
गोवा, 4 ऑगस्ट 2023
15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारत सरकारने “हर घर तिरंगा” मोहीम 2.0 सुरू केली आहे. सर्व नागरिकांना घरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी राज्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये 25 रुपये किंमतीत राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
सर्व सरकारी/खाजगी संस्था, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रध्वज हवे असल्यास 10 ऑगस्टपासून टपाल खात्याशी संपर्क साधावा. राष्ट्रध्वजांच्या मोठ्या प्रमाणात विक्रीच्या ऑर्डरसाठी कृपया पणजी मुख्यालय आणि मडगाव मुख्यालयाशी किंवा विपणन कार्यकारी राजेश मडकईकर (संपर्क क्रमांक 9890701601) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1945727)
Visitor Counter : 133