अर्थ मंत्रालय

उपराष्ट्रपती 4 ऑगस्ट रोजी नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी मध्ये 'प्रणीती' व्याख्यान मालेला संबोधित करणार

Posted On: 03 AUG 2023 3:14PM by PIB Mumbai

नागपूर, 3 ऑगस्ट 2023 


भारताचे उपराष्ट्रपती  जगदीप धनखड  4 ऑगस्ट, शुक्रवार रोजी  भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या 76 व्या तुकडीला  राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटी  येथे प्रख्यात भारतीया द्वारे दिल्या जाणाऱ्या  व्याख्यानमाला - "प्रणीती" च्या उद्घाटन समारंभाला संबोधित करतील. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

"प्रणीती"-या प्रख्यात भारतीयांच्या व्याख्यानमालेचा उद्देश अभिमानाची भावना, सहभाग आणि समाजाला परतफेड करण्याचे तत्व रुजवणे हा आहे. सदर व्याख्यानमाला   एनएडीटी अधिकारी प्रशिक्षणार्थींना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद साधण्याची आणि कर सुविधा प्रदान करणा-या त्यांच्या भावी भूमिकेसाठी  त्यांना सज्ज करण्याची एक  संधी  असते. भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या तुकडीत 57 अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि भूतान रॉयल सर्व्हिसचे  2  अधिकारी  सध्या  सेवापूर्व प्रशिक्षण घेत आहेत. 101 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या नव्याने पदोन्नती झालेल्या सहाय्यक आयुक्तांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम 2023 देखील सध्या आयोजित केला जात आहे.


एनएडीटी विषयी:
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर ही  केंद्र सरकारच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी (आयकर) सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. संघ लोकसेवा आयोग - यूपीएससी-  द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा   द्वारे  आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भरती  केलेल्या आयआरएस अधिकारी फील्ड ऑफिसमध्ये रुजू होण्यापूर्वी सुमारे 16 महिन्यांचे प्रवेश पूर्व प्रशिक्षण घेतात. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर आणि संबंधित कायदे, व्यवसाय कायदे, खाती आणि लेखा प्रणालींमध्ये विशेष माहिती प्रदान केली जाते.  शिवाय, अधिकारी प्रशिक्षणार्थी यांना कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी तयार  केले जाते .विशेषत: करदात्याच्या सेवांबद्दल संवेदनशील  करुन त्यांना करअनुपालनासाठी देखील प्रशिक्षित केले जाते. प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसद, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी भारतातील विविध संवैधानिक आणि वैधानिक संस्थांशी देखील या अधिकाऱ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातात


S.Rai/D.Wankhede/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1945395) Visitor Counter : 88


Read this release in: English