संरक्षण मंत्रालय
मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने आयोजित केले मान्सून विचारमंथन व्याख्यान
Posted On:
02 AUG 2023 7:54PM by PIB Mumbai
मुंबई, 2 ऑगस्ट 2023
मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने मंगळवारी (01 ऑगस्ट 2023) कुलाबा, मुंबई येथील अगस्त्य सभागृह, आयएनएचएस अश्विनी येथे दुसरे मान्सून विचारमंथन व्याख्यान आयोजित केले.
कमोडोर (डॉ) श्रीकांत केसनूर, व्हीएसएम हे निवृत्त नौदल अधिकारी यात प्रमुख अतिथी वक्ते होते. आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक कमांडिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींमध्ये काम केले आहे आणि सागरी संचालन, प्रशिक्षण, नेतृत्व, मुत्सद्दीपणा आणि प्रशासनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. 'लीडरशिप लेसन्स ऑफ इंडियन नेव्हल आयकॉन्स: ॲडम आर एल परेरा अँड आदर ल्युमिनरीज' या व्याख्यानात, कमोडोर केसनूर यांनी सामरिक, संचालनात्मक आणि धोरणात्मक पातळीवर नेतृत्वाचे महत्त्व सांगितले. ज्यामुळे भारतीय नौदलाच्या उभारणीत आणि यशस्वी नौदलाला आकार देण्यावर तसेच विविध संचालनात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याचा फायदा झाला.
माजी नौदल प्रमुख दिवंगत ॲडम आर एल परेरा तसेच इतर दिग्गजांचे उदाहरण देऊन, त्यांनी आपल्या देशाच्या सागरी वारशावर त्यांचे असाधारण योगदान आणि त्यांचा चिरस्थायी प्रभाव अधोरेखित करत त्यांच्या जीवन प्रवासाचा तपशीलवार आलेख मांडला. प्रमुख पाहुणे, व्हाइस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन अतिविशिष्ट सेवा पदक , नौदल पदक प्राप्त नौदल प्रकल्प महासंचालक (मुंबई) यांच्या हस्ते अतिथी वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. नौदल कर्मचारी, इतिहासकार, विद्यार्थी आणि सागरी प्रेमींचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता. हा संवाद अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरक आणि नेतृत्व आणि नौदल मूल्य प्रणालीमध्ये मौल्यवान माहिती प्रदान करणारा होता.
स्रोत: मुख्य जनसंपर्क अधिकारी(संरक्षण), मुंबई
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1945211)
Visitor Counter : 78