अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

टाटा मेमोरियल सेंटरच्या “प्रत्येकाला आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग चिकित्सा आणि शुश्रूषा” केंद्रांची महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने, राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सुरुवात

Posted On: 02 AUG 2023 3:37PM by PIB Mumbai

मुंबई, 2 ऑगस्ट 2023

 

कर्करोग रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात आणि सहज उपलब्ध अशी उपचार सुविधा, हे मोठेच आव्हान असते. मात्र, कर्करोग चिकित्सा परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध व्हावी, तसेच कर्करोग प्रतिबंधक काळजी घेऊन, कर्करुग्णांचे प्रमाण कमी करता यावे, या दृष्टीने, टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने  महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने, प्रत्येकाला आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग चिकित्सा आणि शुश्रुषा असा प्रकल्प सुरू केला होता, जेणेकरून, जिल्हा स्तरावरील आरोग्य संस्थांमधे, कर्करोग शुश्रूषा सेवा अधिक मजबूत केली जाऊ शकेल.

महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमधे जून 2016 पासून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात, सहा जिल्ह्यात प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमधे देखील त्याचा विस्तार करण्यात आला आहे.

डॉ. राजेंद्र बडवे, (टीएमसीचे संचालक), डॉ. श्रीपाद बाणावली, (शैक्षणिक संचालक, टीएमसी), डॉ. विजय बाविस्कर (सहसंचालक, एनसीडी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र) आणि डॉ. पंकज चतुर्वेदी (उपसंचालक, केंद्र) कॅन्सर एपिडेमियोलॉजीसाठी, प्रोफेसर, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी सर्जन, टीएमसी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेड अँड नेक ऑन्कोलॉजिक सोसायटीजचे संचालक) यांनी सोमवारी, म्हणजेच 31 जुलै 2023 रोजी  या प्रकल्पाचा दुसरा टप्पा उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे, अशी अधिकृत घोषणा केली.

या प्रकल्पाअंतर्गत, दरवर्षी 27 जुलै रोजी येणाऱ्या वर्ल्ड हेड अँड नेक कॅन्सर डे (डोके आणि मानेच्या कर्करोग जागतिक दिन)चे औचित्य साधत,  मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दंत शल्यचिकित्सकांसाठी एका वैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अंतरिम प्रकल्प अहवालाचे प्रकाशन व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, जिल्हा स्तरावर मुखाच्या कर्करोगाच्या सेवा बळकट करण्यासाठी, महाराष्ट्र ओरल कॅन्सर वॉरियर्सचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स (MCWs) हा कर्करोग तज्ञांचा एक स्वयंसेवी गट आहे ज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी विद्यार्थी असून ते त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये सेवा देत आहेत. वैद्यकीय आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये जिल्हा सिव्हिल रुग्णालयात मोफत सेवा देण्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्सनी एक अभिनव पुढाकार घेतला आहे.

कर्करोग प्रतिबंध आणि सामान्य कर्करोगाचे लवकर निदान, तपासणी आणि प्रतिबंध यासाठी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी आणि महाराष्ट्राच्या जिल्हा सिव्हिल रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे टीएमसीचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी कौतुक केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एनसीडीचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या कर्करोग नियंत्रण उपक्रमांची माहिती दिली.

टीएमसीचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बाणवली यांनी आपल्या बीजभाषणात एनसीडी स्क्रीनिंगचे महत्त्व आणि कर्करोग प्रक्रियेचा अभ्यास करून जिल्हा स्तरावर कर्करोग उपचार सेवा कशी सुधारता येईल याबद्दल माहिती दिली.

डॉ. पंकज चतुर्वेदी (उपसंचालक, कॅन्सर एपिडेमिओलॉजी सेंटर, प्राध्यापक, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी सर्जन, टीएमसी, आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेड अँड नेक ऑन्कोलॉजिक सोसायटीचे संचालक) यांनी "सर्वांसाठी परवडणाऱ्या कॅन्सर केअरमध्ये प्रवेश" अंतर्गत महाराष्ट्र ओरल कॅन्सर वॉरियर्स आणि कर्करोग नियंत्रण उपक्रम सुरू करण्यामागील संकल्पना स्पष्ट केली.

या वैज्ञानिक कार्यशाळेत महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय दंत महाविद्यालयांचे डॉक्टर आणि इतर खासगी संघटनांचे 200 प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुखाच्या कर्करोगाच्या सामान्य आणि घातक स्थितीचे निदान आणि डोके व मान कर्करोगतज्ज्ञ सर्जनद्वारे मुखाच्या बायोप्सी तंत्रांचे प्रात्यक्षिक हे कार्यशाळेचे ठळक वैशिष्ट्य होते.

 

S.Patil/R.Aghor/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945000) Visitor Counter : 142


Read this release in: English