नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दल, गोवा यांच्याकडून उडेर धबधब्यावर स्वच्छता मोहीम

Posted On: 02 AUG 2023 2:06PM by PIB Mumbai

भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियाना'च्या उपक्रमाच्या अनुषंगाने आणि 'स्वच्छ सागर अभियाना'शी स्वत:ला जोडून भारतीय तटरक्षक दल समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा स्वच्छ करुन, समुद्रकिनारे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नात सातत्याने अग्रणी भूमिका निभावत आहे. वेर्णा येथील उडेर धबधब्याच्या स्वच्छतेसाठी भारतीय तटरक्षक दलाने नुकतेच स्वच्छता अभियान हाती घेतले होते. स्वच्छता मोहिमेत 30 जुलै 2023 रोजी तटरक्षक वैमानिकी तपासणी सेवा विभागासह  40  कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

तटरक्षक दलाच्या जवानांनी धबधब्याला भेट दिली असता त्यांनी प्लास्टिक आणि काचेने भरलेला परिसर पाहिला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि 'आम्ही संरक्षण आणि संवर्धन करतो' या घोषवाक्याखाली 'स्वच्छ आणि हरित भारता'च्या संकल्पनेला चालना देण्यासाठी सीजीएआयएस गोवा चमूने स्थानिक आणि पर्यटकांसह स्वच्छता मोहीम हाती घेतली. स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी  वेर्णा पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेतून 250 किलो प्लास्टिक आणि काचेचा कचरा गोळा करण्यात आला असून, पर्यावरणाच्या जबाबदारीचा संदेश देत तटरक्षक दलाने सर्व स्थानिकांना आणि पर्यटकांना गोव्याच्या प्राचीन सौंदर्याचे आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

***

SamarjitT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1944957) Visitor Counter : 112


Read this release in: English