माहिती आणि प्रसारण मंत्रालय

समाजातल्या त्रुटींवर नर्मविनोदी पद्धतीने उपरोधात्मक भाष्य करणाऱ्या कालातीत चित्रपट  "जाने भी दो यारों" चे मोठ्या पडद्यावर पुनरागमन, भारताच्या समृद्ध सिनेमॅटिक वारशाचे दर्शन

Posted On: 29 JUL 2023 5:27PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) रविवारी, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अभिजात संस्मरणीय असा चित्रपट "जाने भी दो यारों" चे विशेष सादरीकरण करणार आहे. क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स इनिशिएटिव अंतर्गत अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या कालातीत विनोदीपटाचे पुन्हा सादरीकरण करुन भारतीय सिनेमाचा गौरवशाली वारशाचे दर्शन घडवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

जाने भी दो यांरो 1983 मधे प्रदर्शित झाला.  या अप्रतिम चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शहा यांनी केले होते. अतिशय विनोदी पण विचार करायला लावणाऱ्या ढंगाने त्यांनी ही कलाकृती घडवली आहे. कारकिर्द घडवण्यासाठी धडपणाऱ्या दोन छायाचित्रकारांनी ही कथा आहे. ते दोघे भ्रष्टाचाराऱ्यांद्वारे जाळ्यात अडकवले जातात.  दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी आणि रवी वासवानी यांनी या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच ओम पुरी, पंकज कपूर आणि सतीश शहांसारखे एकाहून एक सरस अभिनेते चित्रपटात आहेत. सामाजिक मुद्यांवर व्यंगात्मक भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडतो.

भष्ट्राचारी आणि शक्तीशाली लोकांच्या घोटाळ्यांभोवती अडखळत अतिसाहस करणाऱ्या दोन निरागसांभोवती ही कथा फिरते. दुर्दैव म्हणजे कधीच न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागते. समाजातल्या काळ्या गडद बाजूवर सिनेमा प्रकाश टाकतो. जाने भी दो यांरो हा केवळ अभिजात सिनेमाच ठरला नाही तर त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत खूप प्रेम आणि कौतुक मिळवलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासील तो सर्वाधिक लोकप्रिय, पसंतीच्या सिनेमांपैकी एक ठरला आहे.

चित्रपटाचा शेवट असलेले महाभारतातील पौराणिक दृश्य तर अविस्मरणीय आहे. विविध ओटीटी मंचावर असंख्य वेळा पाहिल्यानंतरही प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट झाल्याशिवाय राहत नाही.

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाने (एनएमआयसी) - एनएफडीसी, क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स इनिशिएटिव्हच्या सहकार्याने, "जाने भी दो यारों" चे मुंबईतील एनएमआयसी इथे आयोजन केले आहे.  हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश विनामूल्य आहे.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943972) Visitor Counter : 102


Read this release in: English