आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएमएसएसवाय  योजनेअंतर्गत मंजूर झालेली  22 नवीन एम्स  पूर्ततेच्या  विविध टप्प्यात

Posted On: 28 JUL 2023 3:29PM by PIB Mumbai

 

भारत सरकारपंतप्रधान आरोग्य सुरक्षा  योजनेची  (PMSSY) अंमलबजावणी करत आहे.  तिसऱ्या  श्रेणीतील किफायतशीर आरोग्य सेवांच्या उपलब्धतेतील  प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि देशातील दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठीच्या सुविधा वाढवणे हा या मागील उद्देश आहे.  या योजनेचे दोन घटक आहेत, ते म्हणजे  (i) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांची (AIIMS) स्थापना आणि (ii) अस्तित्वात असलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालये/संस्था  अद्ययावत करणे. या योजनेअंतर्गत मंजूर झालेले 22 नवीन एम्स  आणि  सरकारी  वैद्यकीय महावियालये / संस्था अद्ययावत करण्याचे 75 प्रकल्प पुर्ततेच्या विविध टप्प्यांवर आहेत.

पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत स्थापन झालेल्या नवीन एम्समधे परिचारिकांसाठी महाविद्यालय स्थापनेची तरतूद आहे. "विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयाशी  संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी" केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत  2014 पासून 157 वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 157 परिचारिका महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.  भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Kakade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1943712) Visitor Counter : 106


Read this release in: English , Urdu