इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

डिजिटल इंडियाचे सक्षमीकरण : आधारची नवीन आणि सुधारित वैशिष्ट्ये

Posted On: 27 JUL 2023 9:30PM by PIB Mumbai

मुंबई, 27 जुलै 2023

 

भारताची वैशिष्ठ्यपूर्ण  बायोमेट्रिक ओळख प्रणाली 'आधार', नवीन वैशिष्ठ्यांसह  अद्ययावत करण्यात आली असल्याचे,भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने म्हटले आहे. या सुधारणांची संरचना नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी, सेवांमध्ये अखंड प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाच्या दिशेने देशाच्या प्रवासाला बळकटी देण्यासाठी करण्यात आली आहे. ही वैशिष्ठ्ये  माहितीची गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्याने विचारात घेऊन, सर्व लागू नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, विकसित करण्यात आली आहेत असेही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सांगितले आहे.

आम्ही ओळख प्रमाणीकृत करणे, सरकारी लाभ मिळवणे आणि विविध सेवांशी संलग्न कसे आहोत हे परिवर्तन घडवण्यात आधारने आधीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या नवीन वैशिष्ठयांच्या समावेशासह, आधार व्यक्तींच्या डिजिटल परिसंस्था हाताळण्याच्या  पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

मुख्य वैशिष्ठ्ये  आणि फायदे:

  • बायोमेट्रिक लॉकिंग/अनलॉकिंग: बायोमेट्रिक लॉकिंग/अनलॉकिंग वैशिष्ट्याचा फायदा घेऊन वापरकर्ते आता त्यांच्या बायोमेट्रिक माहितीवर अधिक नियंत्रण ठेवू शकतात. हे नागरिकांना त्यांचा बायोमेट्रिक डेटा लॉक करण्यास, अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यास आणि डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यास सक्षम करते.
  • ऑफलाइन आधार पडताळणी: पडताळणी प्रक्रियेदरम्यान लागणारी निरंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता टाळून, आधार कार्डधारक आता ऑफलाइन आधार पडताळणी पद्धत वापरू शकतात. हे वैशिष्ट्य मर्यादित इंटरनेट सुलभता  असलेल्या भागातही रिअल-टाइम प्रमाणीकरण सुनिश्चित करते.
  • व्हर्च्युअल आधार आयडी (व्हीआयडी): व्हीआयडीचा वापर वापरकर्त्यांना प्रमाणीकरणाच्या उद्देशाने त्यांचा वास्तविक आधार क्रमांक सामायिक करण्याऐवजी तात्पुरते 16-अंकी व्हीआयडी क्रमांक तयार करण्याची परवानगी देऊन गोपनीयता वाढवतो. व्हीआयडी विविध सेवांसाठी वापरला जाऊ शकतो, ज्यामुळे ओळख उघड होऊन त्याचा गैरवापर होण्याची  जोखीम कमी होते.
  • वेळ-आधारित वन-टाइम पासवर्ड (TOTP): आधार वापरकर्ते आता mAadhar मोबाइल अॅपद्वारे वेळ-आधारित ओटीपी (TOTP) व्युत्पन्न करू शकतात, जे  प्रमाणीकरणादरम्यान सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर प्रदान करते.
  • चेहरा प्रमाणीकरण: अधिक समावेशी प्रमाणीकरण यंत्रणा प्रदान करण्यासाठी, चेहरा प्रमाणीकरण हे आधार प्लॅटफॉर्ममध्ये अंतर्भूत केले गेले आहे. फिंगरप्रिंट-संबंधित आव्हाने असलेल्यांसाठी सोयी आणि प्रवेशयोग्यता जोडून, वापरकर्ते आता त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्याचे बायोमेट्रिक्स वापरू शकतात.
  • आधार QR कोड: नवीन आधार QR कोड वापरकर्त्यांना त्यांचे आधार तपशील सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे सामायिक करण्यास अनुमती देतो, विविध सेवांसाठी त्वरित ओळख पडताळणी सक्षम करतो. 
  • आधार प्रमाणीकरण इतिहास: हे वैशिष्ठ्य  वापरकर्त्यांना त्यांच्या आधार प्रमाणीकरण इतिहासाचा मागोवा घेण्यास आणि त्यांचे परीक्षण करण्यास अनुमती देते, त्यांची आधार माहिती केव्हा आणि कुठे वापरली जाते याबाबत  पारदर्शकता आणि नियंत्रण प्रदान करते.

ही नवीन वैशिष्ठ्ये  जाणून घेण्यासाठी आणि सुधारित आधार परिसंस्थेचा अनुभव घेण्यासाठी, अधिकृत आधार संकेतस्थळाला भेट द्या किंवा तुमच्या भ्रमणध्वनीवर तुमचे mAadhar अॅप अद्ययावत करा.

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943468) Visitor Counter : 122


Read this release in: English