ग्रामीण विकास मंत्रालय
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या आठवड्यापर्यंत 2.92 कोटी घरे केली मंजूर
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2023 7:40PM by PIB Mumbai
मुंबई, 26 जुलै 2023
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली आहे. पात्र ग्रामीण कुटुंबांना अर्थसहाय्य देऊन 31 मार्च 2024 पर्यंत पायाभूत सुविधा असलेली 2.95 कोटी पक्की घरे बांधणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी उद्दिष्टीत 2.95 कोटी घरांपैकी एकूण 2.92 कोटी घरे लाभार्थ्यांना मंजूर केली आहेत आणि 20.07.2023 पर्यंत 2.41 कोटी घरे बांधून पूर्ण झाली आहेत. सध्या, मार्च 2024 नंतर प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणचा पुढील टप्पा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1943010)
आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English