युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्यस्तरीय फेरीतील विजेत्यांचा सत्कार करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर मुंबईत येणार
Posted On:
22 JUL 2023 3:42PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर 23 जुलै 2023 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य स्तरीय फेरीतील विजेत्यांचा सत्कार करणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने दुसऱ्या फिट इंडिया क्विझमधील राज्यस्तरीय फेरीतील विजेत्यांचा हा सत्कार समारंभ आयोजित केला असून दुपारी 4:30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्यस्तरीय विजेत्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जातील.
फिट इंडिया क्विझ हा फिट इंडिया चळवळीचा एक भाग असून याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केली होती. भारताला एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. फिट इंडिया क्विझ 2022 ही शाळा आणि शालेय विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करणारी क्रीडा आणि तंदुरुस्तीशी संबंधित भारतातील सर्वात मोठी प्रश्नमंजुषा आहे.
गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी शाळांसाठी फिट इंडिया नॅशनल फिटनेस अँड स्पोर्ट्स क्विझच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली होती, त्यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच नवउद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, युवा व्यवहार, क्रीडा आणि गृह मंत्रालय राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते. या प्रश्नमंजुषेत भारताचा समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण यांच्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1941721)
Visitor Counter : 113