रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते अपघात
Posted On:
20 JUL 2023 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
2021 वर्षासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 1,53,972 आणि गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या 1,72,278 इतकी होती. डीआयएमटीएस ने TRIPP-IIT दिल्लीच्या सहकार्याने “भारतातील रस्ते अपघाताची सामाजिक-आर्थिक किंमत ” यावर केलेल्या संशोधनाच्या अहवालानुसार , रस्ते अपघातांची सामाजिक-आर्थिक किंमत देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे 3.14% आहे.
शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवा यावर आधारित रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयाने बहु-आयामी धोरण आखले असून त्यानुसार विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याबाबत अधिक माहिती खालीलप्रमाणे:
- रस्ते सुरक्षेबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी मंत्रालयाने सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रचार आणि जनजागृती मोहीमा राबवल्या. तसेच जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा बळकट करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा माह /सप्ताह पाळणे.
- मंत्रालयाअंतर्गत सर्व रस्ते एजन्सीच्या अधीक्षक अभियंता किंवा समकक्ष स्तरापर्यंतच्या तांत्रिक अधिकार्यांसाठी रस्ते सुरक्षा लेखापरीक्षक अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.
- तसेच नियोजनाच्या टप्प्यावर रस्ते सुरक्षा हा रस्त्यांच्या रचनेचा अविभाज्य भाग बनवण्यात आला आहे. सर्व राष्ट्रीय महामार्गांचे रचना, बांधकाम, परिचालन आणि देखभाल या सर्व टप्प्यांवर थर्ड पार्टी ऑडिटर्स/तज्ज्ञांमार्फत रस्ते सुरक्षा लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट्स/अपघातप्रवण क्षेत्रे ओळखणे आणि ती दुरुस्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे .
- मंत्रालयाच्या अंतर्गत आदर्श सुरक्षित रस्ते म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील 130 मार्ग निवडण्यात आले आहेत.
- मंत्रालयाने वाहनातील पुढील सीटवर चालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅगची अनिवार्य तरतूद अधिसूचित केली आहे. त्याचबरोबर 15 फेब्रुवारी 2022 च्या अधिसूचनेद्वारे मोटारसायकल चालवताना किंवा त्यावरून नेताना चार वर्षांखालील मुलांसाठी सुरक्षा उपायांशी संबंधित निकष निर्धारित केले आहेत. तसेच सेफ्टी हार्नेस, क्रॅश हेल्मेटचा वापर करण्याची सूचना केली असून वेग मर्यादा ताशी 40 किमी निश्चित केली आहे.
- वर्ष 2016-2018 च्या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची संख्या 25 इतकी आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1941158)