अणुऊर्जा विभाग

वर्ष 2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 7480 मेगावॉटवरून 22840 मेगावॉट होईल - अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 20 JUL 2023 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जुलै 2023

 

देशाची अणुऊर्जा निर्मितीची सध्याची स्थापित क्षमता 23 अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून 7480 मेगावॉट इतकी असून ती 2031 पर्यंत 22480 मेगावॉटपर्यंत वाढेल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. देशात सध्या विविध भागात उभारणी सुरू असलेले आणि मंजुरी मिळालेले प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा निर्मितीक्षमता वाढेल असे त्यांनी सांगितले. सरकारने भविष्यात अणुभट्ट्या उभारण्यासाठी नव्या प्रकल्प स्थळांना तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  2022-23 या वर्षात अणुऊर्जा प्रकल्पांमधून 46,982 दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती झाली.

या वर्षातील हे अणुवीजनिर्मितीचे प्रमाण देशाच्या एकूण वीजनिर्मितीच्या सुमारे 2.8% होते. याचा तपशील खालील परिशिष्टात दिला आहे.

परिशिष्ट

राज्य

स्थळ

युनिट

क्षमता (MW)

महाराष्ट्र

तारापूर

TAPS-1&

160

TAPS-2&

160

TAPS-3

540

TAPS-4

540

राजस्थान

रावतभाटा

RAPS-1@

100

RAPS-2

200

RAPS-3&

220

RAPS-4

220

RAPS-5

220

RAPS-6

220

तामिळनाडू

कल्पक्कम

MAPS-1&

220

MAPS-2

220

कुडानकुलम

KKNPP-1

1000

KKNPP-2

1000

उत्तर प्रदेश

नरोरा

NAPS-1

220

NAPS-2

220

गुजरात

काक्रापार

KAPS-1

220

KAPS-2

220

KAPS-3*

700

कर्नाटक

कैगा

KGS-1

220

KGS-2

220

KGS-3

220

KGS-4

220

@ RAPS-1 हा तांत्रिक-आर्थिक मूल्यांकनासाठी विस्तारित शट डाऊनखाली आहे.

& TAPS-1&2, RAPS-3 & MAPS-1 हे सध्या प्रकल्प स्थितीत आहेत.

* सध्या 90% ऊर्जेवर चालवला जात आहे.

 

* * *

R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1941092) Visitor Counter : 102